टोकियो : पूर्वोत्तर जपानमध्ये 7.2 क्षमतेच्या तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर जपानच्या हवामान संस्थेने १ मीटरच्या त्सुनामीची शक्यता वर्तवली आहे. मियागी प्रदेशात हा भूकंप झाला आहे.
मियागीमधून नुकसानीची कोणतीही माहिती आली नाही. मात्र, या प्रदेशाच्या अणु प्रकल्पांच्या स्थितीची पाहणी करण्यात येत आहे, असे स्थानिक माध्यमांनी सांगितले.
M7.2 Strong earthquake in Tohoku, Shindo 5強 (Strong) Tsunami warning ⚠️ around Ishinomaki (Miyagi) – it was fairly long here in Tokyo, felt like a Shindo 3. pic.twitter.com/ifCytRd4jn
— John Daub (ONLY in JAPAN) (@ONLYinJAPANtv) March 20, 2021
गेल्या महिन्यात झालेल्या एका भूकंपात अनेकजण जखमी झाले होते. त्यावेळी या प्रदेशलाही हादरा दिला होता. जपान पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर आहे, जिथे तीव्र भूकंपाचा नेहमी धोका असतो. हे क्षेत्र दक्षिणपूर्व आशिया आणि पॅसिफिक खोऱ्यात पसरलेले आहे.