Important information given by the Minister of Education regarding 10th-12th examinations

मोठी बातमी : १० वी -१२ वीच्या परीक्षांसंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

महाराष्ट्र शैक्षणिक

मुंबई : इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षांसंदर्भात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे. यंदाच्या वर्षी विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी ३० मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार असून परीक्षा सकाळी ११ ऐवजी १०.३० वाजता सुरू होईल. दहावी आणि बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळेत ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात येणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महत्वाचे मुद्दे :

 1. विद्यार्थी असलेल्या शाळेतच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
 2. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्ग खोल्या कमी पडल्यास नजीकच्या शाळेत परीक्षेची व्यवस्था केली जाईल.
 3. यंदाच्या वर्षी लेखी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मिनिटांचा वाढीव वेळ मिळेल.
 4. दिव्यांग विद्यार्थ्यांना एक तासाचा वाढीव वेळ मिळेल.
 5. ४० – ५० मार्क्सच्या पेपरसाठी १५ मिनिटांचा वाढीव वेळ मिळेल.
 6. यावर्षी अर्धातास आधी म्हणजेच ११ ऐवजी १०.३० वाजता परीक्षा सुरू होईल.
 7. विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास विशेष परीक्षा जून महिन्यात घेतली जाईल.
 8. दहावी-बारावीच्या प्रॅक्टिकल परीक्षा लेखी परीक्षेनंतर १५ दिवसांत होतील.
 9. २२ ते १० जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल.

सुरक्षात्मक उपाय योजना :

 1. परीक्षेसंदर्भात शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, केंद्र प्रमुख पर्यवेक्षक व अन्य बाबी साठी स्वतंत्र सूचना देण्यात येतील.
 2. कोविड-19 बाबत केंद्रशासन व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.
 3. राज्यमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरीलच माहिती अधिकृत समजण्यात यावी असं आवाहन सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना करण्यात आलं आहे.

प्रात्यक्षिक परीक्षा :

 1. दहावीच्या दरवर्षी प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जात असत. परंतु या वर्षी कोविड -19 परिस्थितीमुळे विशिष्ट लेखन कार्य ( Assignment ) गृहपाठ पध्दतीने घेण्यात येतील.
 2. प्रात्यक्षिक परीक्षा ऐवजी विशिष्ट लेखनकार्य, गृहपाठ पध्दतीने 21 मे ते 10 जून या कालावधीत सादर करण्यात यावेत असं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 3. बारावीच्या लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक परीक्षा दि . 22 मे ते 10 जून या कालावधीत होतील.
 4. कोविड-19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेमध्ये प्रात्यक्षिकांचा सराव कमी असल्यामुळे 12 वी सायन्सच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिके कमी करण्यात आली असून 5 ते 6 प्रात्यक्षिकावरच परीक्षा घेण्यात येईल व त्या संदर्भात माहिती कनिष्ठ महाविद्यालयांना स्वतंत्रपणे देण्यात येईल.
 5. कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लेखी परिक्षेनंतर 15 दिवसात Assignment सादर करावेत.
 6. दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांस अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्यास प्रात्यक्षिक परीक्षा कालावधी मध्ये कोरोनाची लागण झाल्यास किंवा लॉकडाऊन, कन्टेमेंन्ट झोन, संचारबंदी अथवा कोरोना विषय परिस्थितीमुळे, प्रात्यक्षिक परीक्षा किंवा Assignment सादर करण्यासा 15 दिवसाची मुदतवाढ देण्यात येईल, असं बोर्डाने आपल्या निवेदनात सांगितलं आहे.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत