maratha reservation
महाराष्ट्र

मराठा आंदोलनाची पहिली ठिणगी; सोलापूर जिल्ह्या बंद

सोलापूर : मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय न आल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्यभर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान आंदोलनाची पहिली ठिणगी सोलापुरात पडली आहे, सोलापुरात मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. माढा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज पहाटे साडेपाच वाजताच टायर पेटवून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सोलापूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या बंदला विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याभरात कडकडीत बंद पाळला जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्हाभरात आज दिवसभरात कशा पद्धतीने हे आंदोलन पार पडतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सोलापूर शहर आणि जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात कडक पोलीस बंदोबस्त लावला आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. आंदोलन करण्यावर आंदोलक ठाम आहेत. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारच प्रतिकात्मक श्राद्ध घातले जाणार आहे.

जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणा दिल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत