3 storey building collapses in Patel Compound area in Bhiwandi
महाराष्ट्र मुंबई

भिवंडीत पटेल कंपाउंड परिसरात तीन मजली इमारत कोसळली, ८ ठार

भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण दबले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. स्थानिकांनी २० जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढून वाचवले. मात्र आणखी काहीजण ढिगाऱ्यात अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफ, अग्नीशमन दल, पोलीस, वैद्यकीय पथक आणि स्थानिक नागरिक मदतकार्यात गुंतले आहेत.

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत