भिवंडी: भिवंडीमध्ये पटेल कंपाउंड परिसरात मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळली. ही इमारत जिलानी अपार्टमेंट या नावाने ओळखली जात होती. जिलानी अपार्टमेंट १९८४ मध्ये बांधण्यात आली होती. इमारतीत तीन मजले आणि २१ फ्लॅट (२१ घरे) आहेत. इमारत रात्री कोसळली, त्यावेळी सर्व घरात रहिवासी झोपलेले होते. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी […]

