Data Care Corporation distributes raincoats to police at Deccan Police Station

डाटा केअर कार्पोरेशन कंपनीकडून पोलिसांना पावसाळी रेनकोटचे वाटप!

कोरोना पुणे महाराष्ट्र

पुणे : डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या प्रयत्नातून डेक्कन परिसरात असलेले डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी) कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्या सहयोगाने डेक्कन पोलिस स्टेशनमधील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना 150 पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी उभे राहिले. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून अनेकदा कायदा-सुव्यवस्थेकामी जास्तीत जास्त तास बंदोबस्तात पावसात उभे राहून काम करावे लागत आहे. या पार्श्वभूमिवर पोलिसांना पावसाळी रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी डेक्कन पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) संजय मोगले यांच्यासह पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार उपस्थित होते.

डी.सी.सी कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी डेक्कन पोलिस स्टेशनमधील पोलिसांशी संवाद साधला. पुणे शहर पोलिस दलाने कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याबाबत तसेच जनतेस येणाऱ्या सर्व संकटाच्यावेळी मदतीस धावून येणारा प्रथम नागरिक म्हणजे पोलिस अशा शब्दात त्यांनी पुणे पोलिस दलाचे मनस्वी कौतुक केले.

याप्रसंगी डेक्कन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी पुणे पोलिसांना रेनकोट वाटपाच्या हितावह उपक्रमामुळे पोलिसांचे मनोबल उंचावून उत्तमोत्तम कर्तव्य बजावण्याची त्यांच्यात ऊर्जा निर्माण होत असल्याने डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी) कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के व त्यांचे इतर सहकार्यांचे आभार व्यक्त केले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत