The two brutally murdered a 15-year-old vegetable seller

पुण्यात खळबळ! अल्पवयीन मुलाने केली आईच्या प्रियकराची निर्घृण हत्या

क्राईम पुणे महाराष्ट्र

भोसरी : एका 17 वर्षीय मुलाने आपल्या आईच्या प्रियकराची हत्या केली, कारण तो सतत या मुलाला शिवीगाळ करून मारहाण करायचा. दीपक गोपाळ वाघमारे (२९) असे मृताचे नाव आहे. अल्पवयीन मुलाने एक कोयता चोरला आणि आपल्या आईच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक वाघमारे याचे अल्पवयीन मुलाच्या आईसोबत प्रेमसंबंध होते. दीपक दारू पिऊन अल्पवयीन मुलगा व त्याच्या बहिणीला त्रास द्यायचा, शिवीगाळ करून मारहाण करायचा. त्यामुळे वैतागलेल्या अल्पवयीन मुलाने साथीदारांसह वाघमारेला मारण्याचा कट रचला. त्याने चार महिन्यांपूर्वी एका नारळपाणी विक्रेत्याकडून कोयता चोरला होता. या मुलाने शुक्रवारी (17 जून) वाघमारे याला आपल्या एका मित्राकडे तीन हजार रुपये असल्याचे सांगितले आणि खादी मशीन, भोसरी येथील मोकळ्या मैदानात पैसे घेण्यासाठी त्याच्या बरोबर येण्याची विनंती केली. तेथे वाघमारे याच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या मुलाच्या साथीदारांनी वाघमारेला दगडाने मारहाण केली, यात त्याचा मृत्यू झाला.

दरोडा विरोधी पथकाकडून तपास
याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दरोडा विरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास सुरू होता. घटनास्थळी वाघमारे याचे आधारकार्ड मिळाले. त्यावरून त्याची ओळख पटली. काही महिन्यांपूर्वी त्याचे कोणाशी तरी भांडण झाल्याचे समजले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो १७ वर्षांचा मुलगा होता. कोठडीत घेतल्यानंतर या मुलाने साथीदारांच्या मदतीने वाघमारेची हत्या केल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, पोलिस कर्मचारी विक्रांत गायकवाड, सागर शेडगे, गणेश हिंगे, सुमित देवकर, गणेश सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी ५० लाखांची मागणी, मुलीला आणि तिच्या आईला पोलिसांकडून अटक

डेंटिस्टच्या दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या विवाहितेवर सामूहिक बलात्कार

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत