baby girl has died after being attacked by a dog while asleep in a bedroom

तरुणीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म, नंतर तोंडात टॉयलेट पेपर कोंबून केली बाळाची हत्या

क्राईम ग्लोबल

टोकियो : जपानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या बाळाची जन्माला आल्यानंतर लगेच हत्या केली. मुलाच्या तोंडात टॉयलेट पेपर कोंबून तिने बाळाचा जीव घेतला. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली असली तरी या तरुणीने आपला गुन्हा आता कबूल केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये 23 वर्षीय कोयुरी किताई नोकरीसाठी इंटरव्हू द्यायला टोकियोला जात होती, परंतु शहरात आल्यानंतर तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. त्यानंतर किताई टोकियो विमानतळावरील बाथरूममध्ये गेली, तिथेच तिने एका मुलाला जन्म दिला. परंतु, किताईला हे मूल नको होते. तिने अगोदर गर्भपाताचा देखील प्रयत्न केला होता, पण जपानी कायद्यामुळे ती तसे करू शकली नाही. किताईने टोकियो जिल्हा न्यायालयाला सांगितले की ही गर्भधारणा अवांछित होती आणि बाळाला मारणे हा एकमेव पर्याय आहे असे तिला वाटले.

विमानतळाच्या बाथरूममध्येच किताईने आपल्या मुलाची हत्या केली. तिने बाळाच्या तोंडात टॉयलेट पेपर कोंबले आणि त्याची हत्या केली. 2019 मध्ये घडलेल्या या घटनेबाबत आता सुनावणी सुरू झाली आहे. किताईने सांगितले की नको असलेल्या गर्भधारणेपासून मुक्त होण्यासाठी तिने बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाची हत्या केली. किताईने कोर्टात असेही सांगितले की, तिला गर्भधारणेबद्दल काहीही माहिती नव्हती, आणि जेव्हा तिला याबाबत समजले तेव्हा खूप उशीर झाला होता. कारण जपानमध्ये 22 आठवड्यांनंतर गर्भपात करणे बेकायदेशीर आहे. यामुळे तिला गर्भपात करता आला नाही आणि मूल ठेवावे लागले. अशा परिस्थितीत, तिने मुलाला जन्म दिल्यानंतर भीतीपोटी मुलाचा खून केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत