पाकिस्तान : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका नवरीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री चार दरोडेखोरांनी 22 वर्षीय नवविवाहित मुलीवर तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केला. गुरुवारी पोलिसांनी ही माहिती दिली. ही घटना लाहोरपासून सुमारे ३५० किमी दूर असलेल्या मुल्तानमधील शुजाच्या मोचीपुरा येथे बुधवारी पहाटे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी वर मोहम्मद लतीफची वरात वधूसमवेत मोचीपुरा येथील त्यांच्या निवासस्थानी आली. त्यानंतर पोलिसांचा गणवेश परिधान करून आलेल्या चार दरोडेखोरांनी घरात घुसून घरातील सदस्यांना ओलीस ठेवले. त्यानंतर ते नवविवाहित जोडप्याच्या खोलीत घुसले आणि त्यांनी नवरीवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या जोडप्याला मारहाण केली व अत्याचार देखील केले. दरोडेखोरांनी नवरीकडून सुमारे सहा तोळे सोने आणि 1,25,000 रुपये लुटले.
नवविवाहित जोडप्याच्या या घटनेनंतर तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तिथे वैद्यकीय अहवालात बलात्काराची पुष्टी झाली. वधूची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी खुर्रम अली शाह यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याचे आश्वासन दिले. ते म्हणाले, फॉरेन्सिक अहवालातून तपासाची दिशा ठरविण्यात मदत होईल. संशयित आरोपी कट्टर गुन्हेगार होते की काही वैयक्तिक शत्रुत्वामुळे त्यांनी या कुटूंबाला लक्ष्य केले, याचा तपास पोलिस अधिकारी करत आहेत. पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी दोषींना लवकरात लवकर पकडण्याचे निर्देश पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खळबळजनक : पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
थरकाप! १३ वर्षीय मुलीची ११४ वेळा भोसकून निर्घृण हत्या




