नवी दिल्ली : इंग्लंड-न्यूझीलंड क्रिकेट संघाकडून पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला, त्यावरून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावेळी त्यांनी बीसीसीआयला लक्ष्य केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी सोमवारी मिडल ईस्ट आयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, भारत सध्या जागतिक क्रिकेटवर नियंत्रण ठेवत आहे, कारण त्यांच्याकडे […]
ग्लोबल
Stay updated with the latest global news, including important updates and events from around the world. This category brings you breaking news, in-depth reports, and analysis on international affairs, politics, economy, environment, and more. We cover major happenings from across the globe, focusing on how they impact India, Maharashtra, and the world at large. Whether it’s geopolitical developments, global health news, or international trends, our Global News section ensures you stay informed on what’s happening globally.
Bungee Jumping करताना दोरी तुटल्यामुळे महिलेचा मृत्यू, धक्कादायक VIDEO आला समोर
कजाकिस्तान : अशा खेळांदरम्यान मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात दिसतं, की एक महिला अॅडवेंचर खेळात भाग घेते, मात्र हा तिच्या आयुष्यातील शेवटचा खेळ ठरतो. कजाकिस्तानमध्ये राहणारी ३३ वर्षीय येवजीनिया लिओन्तिया तीन मुलांची आई होती. दोन तिची मुलं होती तर तिसरा तिच्या नातेवाईकांचा मुलगा होता. ज्याचा […]
थिएटरमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात अभिनेत्याचा मृत्यू, प्रेक्षकांना वाटला परफॉर्मन्सचाच एक भाग
रशिया : रशियाची राजधानी मॉस्को येथील जगप्रसिद्ध बोलशोई थिएटरमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात एका अभिनेत्याचा मृत्यू झाला. ऑपेरा ‘साडको’च्या (Opera Sadko) सादरीकरणादरम्यान अभिनेत्याचा मंचावर मृत्यू झाला. 37 वर्षीय अभिनेता येवगेनी कुलेश (Yevgeny Kulesh)हा बोलशोई थिएटरमध्ये अभिनय करत होता, यावेळी तो स्टेजवरच अपघाताला बळी पडला. सेटचे दृश्य बदलत असताना कुलेश एका मोठ्या प्रोपखाली (Prop) दबला गेला. यामुळे […]
व्यक्तीने गिळले एक किलो वजनाचे खिळे, बोल्ट, स्क्रू आणि सुऱ्या, तीन तास शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण..
लिथुआनिया : डॉक्टरांकडे अनेकदा विचित्र केस येत असतात. अशीच एक केस लिथुआनिया येथून आली आहे. येथील एका व्यक्तीने दारू सोडल्यानंतर धातूच्या वस्तू गिळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोटात वेदना सुरु झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या वैद्यकीय प्रकरणात, या व्यक्तीच्या पोटातून सुमारे एक किलो वजनाचे खिळे, बोल्ट, स्क्रू आणि सुऱ्या […]
तरुणीने बाथरूममध्ये दिला बाळाला जन्म, नंतर तोंडात टॉयलेट पेपर कोंबून केली बाळाची हत्या
टोकियो : जपानमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने आपल्या बाळाची जन्माला आल्यानंतर लगेच हत्या केली. मुलाच्या तोंडात टॉयलेट पेपर कोंबून तिने बाळाचा जीव घेतला. ही घटना दोन वर्षांपूर्वी घडली असली तरी या तरुणीने आपला गुन्हा आता कबूल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये 23 वर्षीय कोयुरी किताई नोकरीसाठी इंटरव्हू द्यायला टोकियोला जात […]
माथेफिरूने वीर्याने भरलेली सिरिंज महिलेला टोचली, आणि…
अमेरिका : अमेरिकेतील एका व्यक्तीला ‘वीर्य हल्ल्या’साठी (Semen Attack) 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. पुरुषाने एका महिलेवर त्याच्या वीर्याने भरलेल्या सिरिंजने हल्ला केला होता. किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या शरीरात त्याने वीर्याने भरलेली सिरिंज टोचली होती. द सन न्यूजच्या वृत्तानुसार, केटी पीटर्स नावाची महिला मेरीलँडमधील एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. या दरम्यान, […]
मोठी बातमी! स्पेस स्टेशनवर धुर दिसल्याने खळबळ, अंतराळ स्टेशन आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची वाढली चिंता
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर (International Space Station) धुराचा अलार्म वाजल्याने अंतराळ स्टेशन आणि पृथ्वीवरील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. ही घटना गुरुवारी घडली. जेव्हा स्पेस स्टेशनच्या रशियन मॉड्यूलमध्ये प्लास्टिक जळल्यासारखा वास आला. तेथे उपस्थित असलेल्या काही अंतराळवीरांना हा वास आला. यानंतर संपूर्ण अंतराळ स्थानकावर अलर्ट जारी करण्यात आला. काही दिवसांपूर्वी रशियन मॉड्यूलमध्येच क्रॅक आल्याची बातमी आली होती. […]
रशियन मंत्र्याचे एका कॅमेरामनचे प्राण वाचवताना दुःखद निधन
रशिया : रशियाचे आपत्कालीन मंत्री (emergencies minister) येवगेनी झिनिचेव यांचे यांचे एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना निधन झाले आहे. आर्क्टिक शहर नॉर्लिस्क येथे लष्करी कवायतीदरम्यान अधिकृत कर्तव्य बजावत असताना ही दुःखद घटना घडली. रशियाचे आपत्कालीन मंत्री जिनिचेव एका कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हा कॅमेरामन घसरून पाण्यात पडला होता. त्याला वाचवताना हा अपघात झाला. […]
तालिबानने केला शिक्षण क्षेत्रात बदल, सरकारमधील कोणाकडेही पदवी नाही त्यामुळे पदवीचे काही महत्त्व नाही
काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारची घोषणा केली आहे, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शरियत लागू झाल्याची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातही बदल करण्यास सुरूवात केली आहे. आता तालिबानच्या शिक्षण मंत्र्याने शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले आहे की सध्याच्या काळात पीएचडी, पदव्युत्तर पदवीचे काही महत्त्व नाही. तालिबानने सत्ता […]
अर्जेंटिनामध्ये जगातील सर्वात मोठ्या उंदरांची दहशत, पण येथे खरे घुसखोर कोण? माणूस की उंदीर?
अर्जेंटिना : अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स जवळ नॉर्डेल्टा (Nordelta) नावाचे एक शहर आहे. या शहरात गेल्या काही दिवसांपासून अचानक जगातील सर्वात मोठ्या उंदरांची दहशत पसरली आहे. ते शहरात मुक्तपणे फिरत आहेत. लोकांच्या बागा अस्वच्छ करत आहेत. यांच्यामुळे रस्त्यांवर अपघात होत आहेत. आता नॉर्डेल्टाचे लोक चिंतेत आहेत की शेकडोंच्या संख्येने आलेल्या या घुसखोरांचे काय करायचे? जगातील […]










