world largest mouse rodent capybaras creating havoc in argentina

अर्जेंटिनामध्ये जगातील सर्वात मोठ्या उंदरांची दहशत, पण येथे खरे घुसखोर कोण? माणूस की उंदीर?

ग्लोबल

अर्जेंटिना : अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स जवळ नॉर्डेल्टा (Nordelta) नावाचे एक शहर आहे. या शहरात गेल्या काही दिवसांपासून अचानक जगातील सर्वात मोठ्या उंदरांची दहशत पसरली आहे. ते शहरात मुक्तपणे फिरत आहेत. लोकांच्या बागा अस्वच्छ करत आहेत. यांच्यामुळे रस्त्यांवर अपघात होत आहेत. आता नॉर्डेल्टाचे लोक चिंतेत आहेत की शेकडोंच्या संख्येने आलेल्या या घुसखोरांचे काय करायचे?

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जगातील या सर्वात मोठ्या उंदीरांना कॅपीबारस (Capybaras) म्हणतात. त्यांचे वैज्ञानिक नाव हाइड्रोकोरस हाइड्रोचेरिस (Hydrochoerus hydrochaeris) आहे. काही लोक त्यांना कार्पिन्चोस (Carpinchos) असेही म्हणतात. ते गेल्या काही आठवड्यांपासून बेफिकीरपणे नॉरडेल्टामध्ये भटकत आहेत. नॉरडेल्टाची लोकसंख्या सुमारे 40 हजार आहे. या उंदरांचा आकार 4 फुटांपर्यंत असू शकतो. त्यांचे वजन 79 किलो पर्यंत असू शकते.

कॅपीबारसने नॉर्डेल्टामधील अनेक बागा खराब केल्या आहेत. ते तिथे विष्ठा करतात. तसेच त्यांच्यामुळे रस्त्यांवर अपघात होत आहेत. ते फुले आणि फळे खराब करत आहेत. एवढेच नाही तर पाळीव कुत्रे आणि मांजरींवरही हल्ला करत आहेत. तथापि, कॅपीबारस हिंसक प्राणी नाहीत. मनुष्य किंवा पाळीव प्राण्यांविषयी ते कधीही हिंसक नव्हते.

पर्यावरणवाद्यांच्या मते, कॅपीबारस नॉर्डेल्टामध्ये घुसखोरी करत नसून ते आपले घर परत घेण्यासाठी आले आहेत. 1990 च्या दशकात, नॉर्डेल्टा पर्यावरणीयदृष्ट्या अतिशय सुंदर आणि अनेक प्रकारच्या प्राण्यांचे घर होते. दक्षिण अमेरिकेतील दुसरी मोठी नदी पारणा नदीच्या काठावर वेटलँड होते. परंतु माणसांनी विकासाच्या नावाखाली या ठिकाणची कॅपीबारसची घरे उद्ध्वस्त केली.

अर्जेंटिनामध्ये पर्यावरणासाठी लढा देणारे प्रसिद्ध वकील एनरिक विल यांच्या म्हणण्यानुसार, हे एक चक्र आहे. नॉर्डेल्टाने कॅपीबारसच्या घरात घुसखोरी केली होती. श्रीमंत रिअल इस्टेट डेव्हलपर्सने सरकारशी संगनमत करून कॅपीबारसचे निवासस्थान खराब केले होते. त्यावेळी देखील आवाज उठवण्यात आला होता, पण कोणी ऐकले नाही. निसर्गाच्या कुशीत मानवाला स्वर्गासारखे घर देण्याचे स्वप्न दाखवून बिल्डरांनी या भागातील प्राण्यांना हुसकावून लावले. लोकांना निसर्गाच्या मध्यभागी तर राहायचे आहे, परंतु तेथे आधीच राहणाऱ्या प्राण्यांबरोबर राहायचे नाही. कारण त्यांना साप, डास आणि जगातील सर्वात मोठे उंदीर नको आहेत. हे चुकीचे आहे. जर तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहायचे असेल, तर तुम्हाला त्या प्राण्यांसोबत राहावे लागेल जे आधीच तेथे राहत आहेत. तुम्ही त्यांना तेथून हाकलू शकत नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत