If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
देश

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ड्युटीवरील चालकाचा मृत्यू, मृताच्या कुटुंबीयांचे गंभीर आरोप

लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मालमत्ता विभागाच्या चालकाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विभागावर निष्काळजीपणाचा आरोप लावला आहे. वैद्यकीय रजेवर असूनही त्यांना ड्युटीवर मंत्री नारायण राणे यांच्यासोबत ठेवण्यात आले, असा आरोप आहे. नातेवाईकांनी विभागाच्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार दिली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कुमार वर्मा राज्य मालमत्ता विभागात चालक म्हणून तैनात होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे लखनौला आले, तेव्हा अशोक कुमार यांची ड्युटी लावण्यात आली होती. ड्युटीवर असताना अशोक यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

मृताच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अशोकची तब्येत खराब होती, त्यामुळे ते वैद्यकीय रजेवर (medical leave) होते, पण जेव्हा नारायण राणे आले, तेव्हा अशोक यांना वैद्यकीय रजा असूनही जबरदस्तीने बोलावण्यात आले. त्यांच्या कुटुंबाने मालमत्ता विभागाचे मोटार प्रभारी अमरीश श्रीवास्तव यांच्यावर आरोप केला आहे की, त्याने अशोकच्या आजाराविषयी माहिती असूनही फोन केला आणि जबरदस्तीने बोलावून घेतले. तसेच न आल्यास अशोक कुमार यांना निलंबित करण्याची धमकी दिली. यामुळे अशोक यांना ड्युटीवर जाणे भाग पडले.

पोलिसांनी सांगितले की अशोक कुमार वर्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. कुटुंबाने हत्येचा आरोप केला असून तक्रार दिली आहे. या प्रकरणाचा तपास करून पुढील कारवाई केली जात आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. कारण काहीही असो, त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत