Ravi Shastri tests positive

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण

क्रीडा

IND vs ENG : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल कसोटीचा चौथा दिवस सुरू होण्याअगोदर, रवी शास्त्री यांच्यासह भारतीय संघाच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या चार सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बीसीसीआयने एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे, त्यानुसार मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. सर्वांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे आणि ते टीमच्या हॉटेलमध्ये राहतील, ते वैद्यकीय टीमकडून पुष्टी होईपर्यंत टीम इंडियासोबत प्रवास करणार नाहीत.

बीसीसीआयने निवेदनात पुढे म्हटले आहे की उर्वरित टीम इंडियासाठी दोन फ्लो टेस्ट देखील करण्यात आल्या. एक काल रात्री आणि दुसरी सकाळी करण्यात आली. ज्या सदस्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी मैदानावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना द ओव्हल येथे खेळला जात आहे. जिथे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाचा स्कोअर तीन विकेट गमावून 270 धावा होता. तिसऱ्या दिवसापर्यंत भारताने 171 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत