An actor at Moscow's Bolshoi Theatre was crushed to death by falling scenery during a set change

थिएटरमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात अभिनेत्याचा मृत्यू, प्रेक्षकांना वाटला परफॉर्मन्सचाच एक भाग

ग्लोबल

रशिया : रशियाची राजधानी मॉस्को येथील जगप्रसिद्ध बोलशोई थिएटरमध्ये झालेल्या दुर्दैवी अपघातात एका अभिनेत्याचा मृत्यू झाला. ऑपेरा ‘साडको’च्या (Opera Sadko) सादरीकरणादरम्यान अभिनेत्याचा मंचावर मृत्यू झाला. 37 वर्षीय अभिनेता येवगेनी कुलेश (Yevgeny Kulesh)हा बोलशोई थिएटरमध्ये अभिनय करत होता, यावेळी तो स्टेजवरच अपघाताला बळी पडला. सेटचे दृश्य बदलत असताना कुलेश एका मोठ्या प्रोपखाली (Prop) दबला गेला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तथापि, रंगमंचावर प्रोप पडताना बघून आणि धावपळ बघून प्रेक्षकांना क्षणभर वाटले की हा देखील परफॉर्मन्सचा एक भाग आहे. त्यांना वाटले की काही स्टंट केले जात आहेत. पण थोड्याच वेळात, लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि माहिती मिळली की अभिनेते येवगेनी कुलेश हे एका जड प्रोपखाली दबल्या गेल्यानंतर स्टेजवर मरण पावले.

शनिवारी घडलेल्या या घटनेची माहिती आता सोशल मीडियावर समोर येत आहे. ज्यात स्टेजवर अचानक हालचाली वाढताना दिसतात. सेटचा देखावा बदलण्यासाठी एक मोठा प्रोप खाली केला जात आहे. कुलेश या प्रोपखाली दफन होतो. सहकारी कलाकारांनी हे बघताच आरडाओरडा सुरू केला. घटनेनंतर, पडदा टाकण्यात आला आणि प्रेक्षकांना सांगण्यात आले की प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.

जखमी कुलेशच्या उपचारासाठी डॉक्टर घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये लोकांना ओरडताना ऐकू येते. रशियन संगीतकार निकोलाई रिम्स्की-कोर्साकोव्ह यांच्या 19 व्या शतकातील ऑपेरा साडकोच्या सादरीकरणात सेट बदलताना ही घटना घडली.

मॉस्कोच्या तपास समितीने एका निवेदनात म्हटले आहे की ते अभिनेत्याच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. तर बोलशोई थिएटरच्या माजी अभिनेत्यांनी अशा जगप्रसिद्ध ठिकाणी काम करण्याच्या या परिस्थितीचा निषेध केला आहे. त्यांनी सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत