1 kg of nails screws and knives came out of the stomach of the man

व्यक्तीने गिळले एक किलो वजनाचे खिळे, बोल्ट, स्क्रू आणि सुऱ्या, तीन तास शस्त्रक्रिया करून वाचवले प्राण..

ग्लोबल

लिथुआनिया : डॉक्टरांकडे अनेकदा विचित्र केस येत असतात. अशीच एक केस लिथुआनिया येथून आली आहे. येथील एका व्यक्तीने दारू सोडल्यानंतर धातूच्या वस्तू गिळण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोटात वेदना सुरु झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचला. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. या वैद्यकीय प्रकरणात, या व्यक्तीच्या पोटातून सुमारे एक किलो वजनाचे खिळे, बोल्ट, स्क्रू आणि सुऱ्या या वस्तू काढण्यात आल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, या रुग्णाची ओळख उघड करण्यात आलेली नाही. परंतु, हे संपूर्ण प्रकरण बाल्टिक हार्बर शहर कालीपेडा येथील हॉस्पिटलमधील आहे. डॉक्टरांनी एक्स-रे केला असता त्यांना धातूचे अनेक तुकडे दिसले. यापैकी काही चार इंचापर्यंत (10 सेंटीमीटर) लांब होते. हे संपूर्ण प्रकरण दुर्मिळ असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी तीन तास शस्त्रक्रिया करून धातूच्या सर्व वस्तू बाहेर काढण्यात यश मिळविले. सर्जन सरुनास डेलीडेना यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली.

डॉक्टरांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी या व्यक्तीने दारू पिणे थांबवल्यानंतर धातूच्या वस्तू गिळण्यास सुरुवात केली होती. ऑपरेशन नंतर रुग्णाची प्रकृती स्थिर असून तो बरा होत आहे. या व्यक्तीला मानसिक मदत देखील देण्यात येत आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत