Russian Emergency Minister Zinichev dies while saving a person's life during drills

रशियन मंत्र्याचे एका कॅमेरामनचे प्राण वाचवताना दुःखद निधन

ग्लोबल

रशिया : रशियाचे आपत्कालीन मंत्री (emergencies minister) येवगेनी झिनिचेव यांचे यांचे एका व्यक्तीचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करताना निधन झाले आहे. आर्क्टिक शहर नॉर्लिस्क येथे लष्करी कवायतीदरम्यान अधिकृत कर्तव्य बजावत असताना ही दुःखद घटना घडली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रशियाचे आपत्कालीन मंत्री जिनिचेव एका कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, हा कॅमेरामन घसरून पाण्यात पडला होता. त्याला वाचवताना हा अपघात झाला. अहवालांनुसार, घटनास्थळी अनेक लोक उपस्थित होते, परंतु काय झाले हे कोणालाही समजले नाही. काही कळायच्या आतच हा सर्व घटनाक्रम घडला. लोकांनी त्यांना फक्त पाण्यात उडी मारताना पाहिले. या घटनेत जिनिचेव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्या कॅमेरामनचा देखील मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

झिनिचेव यांनी 2018 पासून आपत्कालीन परिस्थिती मंत्रालयाचे नेतृत्व केले होते. त्यांनी 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात केजीबी अधिकारी म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि सोव्हिएत नंतरच्या काळात फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) मध्ये काम करत राहिले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत