semen attack us man stabbed woman with syringe filled with his semen

माथेफिरूने वीर्याने भरलेली सिरिंज महिलेला टोचली, आणि…

ग्लोबल

अमेरिका : अमेरिकेतील एका व्यक्तीला ‘वीर्य हल्ल्या’साठी (Semen Attack) 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. पुरुषाने एका महिलेवर त्याच्या वीर्याने भरलेल्या सिरिंजने हल्ला केला होता. किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या एका महिलेच्या शरीरात त्याने वीर्याने भरलेली सिरिंज टोचली होती.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

द सन न्यूजच्या वृत्तानुसार, केटी पीटर्स नावाची महिला मेरीलँडमधील एका सुपरमार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आली होती. या दरम्यान, थॉमस ब्रायन स्टेमेन नावाच्या व्यक्तीने वीर्याने भरलेली सिरिंज त्या महिलेच्या शरीरावर टोचली. 51 वर्षीय थॉमसने अत्यंत चलाखीने त्या महिलेवर ‘वीर्य हल्ला’ केला होता. एवढेच नाही, सिरिंज टोचल्याबरोबर महिलेला वेदना जाणवली, तेव्हा थॉमस त्या महिलेला म्हणाला, “मला माहित आहे, मधमाशी चावल्यासारखे वाटते, नाही का?” सिरिंज टोचल्यानंतर, तो शांतपणे त्या महिलेच्या शेजारी उभा राहिला होता.

अहवालानुसार, केटी पीटर्सवर हा ‘हल्ला’ फेब्रुवारी 2020 मध्ये झाला. दुकानात लावलेल्या कॅमेऱ्यात ही सर्व घटना रेकॉर्ड झाली होती. थॉमसच्या या कृत्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि प्रकरण न्यायालयात पोहोचले. 18 महिन्यांनंतर, थॉमसला आता 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.

पीडितेच्या म्हणण्यानुसार, स्टोअरमध्ये प्रवेश करताना तिला जाणवले की थॉमसने तिला धडक दिली. काही सेकंदांनंतर तिला तिच्या कंबरेजवळ सिगारेट जळत असल्यासारखे वाटले. घरी जाऊन पाहिलं तर तिच्या कंबरेजवळ जखमेसारखे झाले होते. त्यानंतर ती महिला पुन्हा दुकानात गेली आणि सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर तिला संशय आला. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून तपास सुरू केला तेव्हा सत्य बाहेर आले. थॉमसच्या कारमधून आणखी अनेक सिरिंज जप्त केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याने इतर लोकांसोबतही हे कृत्य केले असण्याची शक्यता आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत