Terror Attack In Vienna Austria
देश

ऑस्ट्रियामध्ये दहशतवादी हल्ला; दहशतवाद्याकडून गर्दीवर गोळीबार

ऑस्ट्रियामध्ये सोमवारी संध्याकाळी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून यामधील एक हल्लेखोर आहे. ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये हा हल्ला झाला आहे. हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. व्हिएन्ना पोलिसांनी एका संशयिताला ठार करण्यात आलं असल्याची माहिती ट्विटरवरुन दिली आहे. AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक संशयितांकडून रायफल्सच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला. […]

Delhi won the match against Bangalore
क्रीडा

दिल्लीने बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली; बंगळुरूलाही प्लेऑफचं तिकीट

IPL 2020 Match 55 DC vs RCB : दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धची मॅच ६ विकेट राखून जिंकली. या विजयामुळे मुंबई इंडियन्स पाठोपाठ दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या टीम आयपीएल २०२० स्पर्धेच्या ‘प्ले ऑफ’मध्ये दाखल झाल्या. अजिंक्य रहाणे (६०) आणि शिखर धवन (५४) यांनी केलेल्या अर्धशतकांमुळे दिल्लीच्या संघाने विजय मिळवत गुणतालिकेत दुसरं […]

Bangalore scored 152 for 7 against Delhi
क्रीडा

IPL 2020 : दिल्लीविरूद्ध बंगळुरूच्या ७ बाद १५२ धावा, १३ वर्षात पहिल्यांदा बघायला मिळाली ‘ही’ गोष्ट

दिल्लीविरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने २० षटकात ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर देवदत्त पडीकलने दमदार अर्धशतक केले तर शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने चांगली खेळी केली. एनरिक नॉर्येने ३ बळी घेत बंगळुरूच्या धावगतीला आवर घातला, देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. […]

IPL 2020 DC vs RCB
क्रीडा

IPL 2020 DC vs RCB : दिल्लीने नाणेफेक जिंकून घेतला बॉलिंगचा निर्णय; दोन्ही संघात मोठे बदल

दिल्ली विरुद्ध बेंगळुरू यांच्यात लढत सुरु. दिल्लीने नाणेफेक जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला, दिल्ली आणि बेंगळुरू ला प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग ११मध्ये महत्त्वाचे बदल केले. दिल्लीच्या संघाने अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल आणि डॅनियल सॅम्स या तिघांना संघात स्थान दिलं आहे. तर बंगळुरूच्या संघातून गुरूकीरत आणि […]

Vivo V20 SE smartphone
गॅझेट्स तंत्रज्ञान

विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

विवोचा नवीन स्मार्टफोन Vivo V20 SE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबीच्या इंटरनल स्टोरेज सोबत येतो. फोनला दोन रंगात अॅक्वा मरीन ग्रीन आणि ग्रॅविटी ब्लॅक मध्ये लाँच करण्यात आले आहे. कंपनीने या फोनची किंमत २० हजार ९९० रुपये ठेवली आहे. या फोनचा सेल ३ नोव्हेंबर पासून सुरू होणार […]

supreme court
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : राज्य शासनाच्या घटनापीठ स्थापन करण्याच्या अर्जावर लवकरच निर्णय

मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्याच्या राज्य शासनाच्या अर्जावर लवकरात लवकर निर्णय घेणार असल्याचे सरन्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. मराठा आरक्षण प्रकरणी शासनाचे वकील व ज्येष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांच्या यासंदर्भातील विनंतीनंतर सरन्यायाधीशांनी हे सांगितल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने ९ सप्टेंबर २०२० […]

school education minister varsha gaikwad
महाराष्ट्र शैक्षणिक

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. […]

grant-robertson as Deputy Prime Minister of New Zealand
ग्लोबल

न्यूझीलंडच्या उपपंतप्रधानपदी समलैंगिक असलेल्या ग्रँट रॉबर्टसन यांची निवड

न्यूझीलंड मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने पंतप्रधान जेंसिडा अर्डर्न यांच्या नेतृत्वात दमदार विजय मिळवला. अर्डन यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळाच्या निवडीत अर्डर्न यांनी समलैंगिक असलेले ग्रँट रॉबर्टसन यांची उपपंतप्रधानपदी निवड केली आहे. मागील महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाला दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यास यश आले. पंतप्रधान जेसिंडा […]

Former Union Minister Ram Vilas Paswan's death suspicious
देश

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा मृत्यू संशयास्पद?, न्यायिक चौकशीची मागणी

माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान […]

WHO's Chief Home Quarantine
कोरोना ग्लोबल

WHO चे प्रमुख करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होम क्वारंटाइन

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस हे देखील होम क्वारंटाइन झाले आहेत. कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे ते आता होम क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ”मी कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याचे दिसून आले आहे. सध्या मी पूर्णपणे स्वस्थ आहे व कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. परंतु, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांप्रमाणे […]