More than 200 BJP workers join NCP in the presence of Eknath Khadse
महाराष्ट्र

एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत भाजपच्या २०० हून अधिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव : एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपचे संकट मोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांच्या मतदार संघातच खडसेंनी फूट पाडली आहे. जामनेरयेथील २०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदधिकाऱ्यांनी भाजपसोडून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यापासून जळगावातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदधिकारी यांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. आज २०० […]

French air strike
ग्लोबल

आफ्रिकन देश मालीमध्ये फ्रान्सच्या हवाई दलाने केला एअर स्ट्राइक, ५० दहशतवादी ठार

आफ्रिकन देश मालीमध्ये असलेल्या अल कायदाच्या अतिरेक्यांवर फ्रान्सच्या हवाई दलाने जोरदार हवाई हल्ले सुरू केले. फ्रान्स हवाई दलाच्या मिराज लढाऊ विमाने आणि ड्रोन विमानांनी ही कामगिरी केली. मालीमध्ये केलेल्या एअर स्ट्राइक मध्ये अल कायदाचे जवळपास ५० दहशतवादी ठार झाले. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या हवाई दलाने ३० ऑक्टोबर रोजी ही कारवाई […]

Pune Graduate and Teacher Constituency Election
पुणे

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने […]

Whatsapp storage management tool feature
तंत्रज्ञान

व्हॉट्सअ‍ॅपच्या ‘या’ फीचरने युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं होणार सोपं.. जाणून घेऊयात

व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सच्या सोयीसाठी नवीन अपडेट जाहीर केले आहे. ह्या अपडेट फिचरला स्टोअर मॅनेजमेंट टूल (storage management tool) म्हणून ओळखले जाईल, जे कंपनीने रिडिझाइन केले आहे. त्याचबरोबर, व्हॉट्स अॅपवरील हे नवीन स्टोअर मॅनेजमेंट टूल या आठवड्यात जगभरात आणले जाईल. स्टोरेज मॅनेजमेंट टूल रोलआउट झाल्यानंतर युजर्सना फोनमध्ये चॅट तसेच मीडिया फाइल्स यांचं स्टोरेज मॅनेज करणं सोपं होईल. […]

महाराष्ट्र मुंबई

कंगना रनौतला मोठा झटका; कंगना रनौतसह बहिण रंगोली चंदेलला वांद्रे पोलिसांची नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणी चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोलीला समन्स बजावले आहेत. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी तर, रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी वांद्रे पोलीस ठाण्यात हजर रहायचे आहे. कंगनावर वादग्रस्त वक्तव्ये करुन समाजामध्ये तेढ […]

diet to prevent dengue
तब्येत पाणी ब्लॉग लाइफ स्टाइल

डेंग्यू पासून वाचण्यासाठी ‘ह्या’ गोष्टींचा करा आहारात समावेश..

डेंग्यू हा आजार एका विशिष्ट डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. देशात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. पावसाळ्यानंतर हा आजार खूप वेगाने वाढतो. डेंग्यू विषाणू डासांमुळे पसरतो जे दूषित पाण्यामध्ये वाढतात. हा आजार होण्यापासून बचाव करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपला परिसर स्वच्छ ठेवणे आणि खराब पाणी जमा होण्यापासून प्रतिबंध करणे. प्रतिबंध करणे हे उपचारापेक्षा नेहमी चांगले […]

corona Medicine
देश

खुशखबर : कोरोनावर लशीपेक्षा आधी औषध येण्याची शक्यता.. दोन टप्प्यातील ट्रायल सकारात्मक

पुणे : कोरोनाने संपूर्ण जगाला वेठीला धरले आहे. अद्यापही कोरोनावरील उपचार सापडले नसल्याने काळजीचे वातावरण आहे. भारतात सध्या कोरोनाची आकडेवारी घसरती असली तरीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनावरील लशीसाठी जगभरात प्रयत्न सुरु असले तरी अद्याप यश आले नाहीये. अशातच कोरोनावरील लशीपेक्षा आधी कोरोनावरील औषध येईल अशी माहीती मिळाली आहे. याबाबतची माहीती सीएसआयआरचे […]

Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
क्रीडा

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलचा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता शारजामध्ये रंगणार आहे. मुंबईने यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादचा नेट रनरेट मुंबईनंतर सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर हैदराबादने हा सामना गमावला तर लीगमधील त्यांचा प्रवास येथेच संपेल […]

Prime Minister Narendra Modi
देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विधानसभा निवडणुकी अगोदर बिहार वासियांना आवाहन…

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा निवडणुकी अगोदर ट्विट करून बिहार वासियांना आवाहन केले कि, बिहार विधानसभा निवडणुकीत आज दुसर्‍या टप्प्यात मतदान होणार आहे. माझे सर्व मतदारांना आवाहन आहे की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करुन लोकशाहीचा हा उत्सव यशस्वी करावा. या दरम्यान, खालील सामाजिक अंतरासह मास्क घाला: पंतप्रधान नरेंद्र मोदी. बिहार विधानसभा चुनावों में […]

Rajiv Bajaj
देश

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची चर्चा तर आहे पण, राजीव बजाज म्हणतात…

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असून अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे. तसंच जीएसटी आणि वाहन विक्री क्षेत्रात होत असलेल्या वाढीचं उदाहरणही दिलं जात आहे. दरम्यान, बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी यावर भाष्य केलं. “वाहन क्षेत्रातील विक्री पुन्हा पूर्वपदावर आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यासाठी अजूनही वाट पाहावी लागेल,” […]