Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
क्रीडा

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना

आयपीएलचा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता शारजामध्ये रंगणार आहे. मुंबईने यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादचा नेट रनरेट मुंबईनंतर सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर हैदराबादने हा सामना गमावला तर लीगमधील त्यांचा प्रवास येथेच संपेल आणि कोलकाता नाईट रायडर्स प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील वेळी मुंबईने हैदराबादला 34 धावांनी पराभूत केले होते. शारजामध्येच खेळल्या गेलेल्या मोसमातील 17 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्सवर 208 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादला 7 विकेट्सवर 174 धावा करता आल्या.

शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. शारजामध्ये नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत 200 सामने खेळले आहेत. त्यात 118 सामन्यांत विजय मिळविला आहे, तर 82 मध्ये पराभूत झाला आहे. लीगमध्ये मुंबईचा सक्सेस रेट 59.00% आहे. लीगमध्ये हैदराबादने आतापर्यंत 121 सामने खेळले आहेत. 64 सामन्यांत संघ जिंकला आहे, तर 57 मध्ये पराभूत झाला आहे. हैदराबादचा सक्सेस रेट 53.30% आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत