K L Rahul
क्रीडा

हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!

IPL : IPLचा हंगामात भारतीय आणि परदेशी फलंदाजांनी आपली चमक दाखवली. त्यात अंबाती रायडू, मयंक अग्रवाल, फाफ डु प्लेसिस, रोहित शर्मा, लोकेश राहुल या फलंदाजांनी दमदार खेळी केली. या साऱ्या फलंदाजांपैकी सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने त्याच्या दृष्टीने सर्वोत्तम फलंदाज कोण? याबद्दल मत व्यक्त केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वेस्ट इंडिजचा माजी गोलंदाज इयन बिशप याने राहुलचं कौतुक केलं. “त्याने स्वत:च्या खेळीची ज्याप्रकारे उभारणी केली ते मला आवडलं. त्याने अर्धशतक झळकावलं तेव्हा मी सामना पाहत होतो. मला त्याची खेळी पाहून वाटलं की तो केवळ मैदानावर स्थिरावण्याच्या दृष्टीने खेळतोय. पण त्यानंतर मात्र त्याने खेळीत चांगलाच समतोल राखला. त्याला मिळालेली जीवदानं जाऊद्या, त्याने केलेली फटकेबाजी पाहा. त्याच्या याच खेळीमुळे मला तो एक परिपूर्ण फलंदाज वाटला” इयन बिशपच्या या मताला सहमती दर्शवत गंभीर म्हणाला, “इयन बिशप यांचं राहुलबद्दलचं मत मलाही मान्य आहे. सध्याच्या घडीला मला असं वाटतं की राहुल हा IPLमधला सर्वोत्तम फलंदाज आहे!”

राहुलने बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात ६९ चेंडूत नाबाद १३२ धावा केल्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. याचसोबत राहुलची आजची वैयक्तिक धावसंख्या ही IPLच्या इतिहासातील कर्णधाराने झळकावलेली सर्वोच्च धावसंख्या ठरली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

One thought on “हा आहे IPLचा सर्वोत्तम फलंदाज!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत