अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक रंजक होत चालली आहे. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन यांच्यात अटी-तटीची लढत सुरु आहे. अशातच आता मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. पत्रकार परिषदेत डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. ट्रम्प यांनी जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर निवडणुकीत घोटाळा केल्याचा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
संगमनेर : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठीचा प्रस्ताव तातडीने तयार करा, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निर्देश
संगमनेर येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाने तातडीने तयार करावा, असे निर्देश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले. संगमनेर नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या कॉटेज रुग्णालयाचे रुपांतर महिला रुग्णालयात करण्याचा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आला आहे. ग्रामीण रुग्णालयाचा उपजिल्हा रुग्णालय दर्जावाढ आणि कॉटेज रुग्णालयाचे महिला रुग्णालयात […]
बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन
बॉलिवूड अभिनेता फराज खानने वयाच्या ४६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. फराज खान बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे […]
IPL 2020 : हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्माची कामगिरी, मोडला झहीर खानचा विक्रम
मुंबईविरूद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय आघाडीचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याने सार्थ ठरवला. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना पॉवर-प्लेच्या षटकांमध्येच त्याने माघारी धाडलं. दुखापतीनंतर संघात परतलेला मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा केवळ ४ धावा काढून तिसऱ्याच षटकात झेलबाद झाला. त्यानंतर डावाच्या पाचव्या षटकाला क्विंटन डी कॉकने दमदार सुरूवात केली […]
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
पुणे : अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते. काम पूर्ण करूनही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव […]
तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? – कंगना रानौत
मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कंगनाने एक व्हिडीओ ट्विट केला आहे. कंगनाने […]
ब्रेकिंग : अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल; अर्णब गोस्वामी यांना अटक
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे. अर्णब गोस्वामी आणि पोलीस यांच्यात भांडण झाल्याचे रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही […]
IPL 2020 : मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादचा १० विकेट राखून दणदणीत विजय
सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच दहा विकेट राखून जिंकली आणि दिमाखात प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला. प्ले ऑफ फेरीची पहिली मॅच ५ नोव्हेंबर रोजी आहे. ही मॅच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात दुबईत रंगणार आहे. तर दुसरी मॅच ६ नोव्हेंबर रोजी सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अबुधाबीत होणार आहे. Match 56. […]
महिला आयपीएल (टी-20 चॅलेंज) आजपासून सुरू होणार आहे, जाणून घ्या
मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी […]
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून उभे राहावेच; आम्ही डिपॉझिट जप्त करुन दाखवू – नवाब मलिक
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरमधून निवडणूक लढवूनच दाखवावी. आम्ही त्यांचे डिपॉझिट जप्त करून दाखवू, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी कोथरुड येथील कार्यक्रमात विरोधकांवर टीकास्त्र सोडले होते. मी कोल्हापूर सोडून कोथरुडमधून निवडणूक लढलो म्हणून मी पळून आलो, असे विरोधक म्हणतात. माझी आताही कोल्हापुरातून निवडणूक लढण्याची […]










