मुंबई : महिला आयपीएल (महिला टी-20 चॅलेंज) या वेळी युएईमध्ये होणार आहे. त्याची सुरुवात आज (४ नोव्हेंबर) पासून होईल आणि अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होईल. या स्पर्धेचे हे तिसरे सत्र आहे. आयपीएल लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामन्यांमधील दिवसांमध्ये हे आयोजन केले जाते. यात भारतासह अनेक देशांतील महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. येत्या काही वर्षांत ही स्पर्धा मोठी होईल आणि आयपीएलप्रमाणेच महिला क्रिकेटलाही चालना मिळेल, असा विश्वास आहे
महिला टी -20 चॅलेंज मध्ये एकूण चार सामने खेळले जातील. त्याची सुरुवात आज (4 नोव्हेंबर) पासून होईल आणि 9 नोव्हेंबरला अंतिम सामना होईल. सर्व सामने शारजाहमध्ये खेळले जातील. स्पर्धेचे तीन सामने साडेसात वाजता सुरू होतील. त्याचबरोबर दुसरा सामना दुपारी साडेतीन वाजेपासून खेळला जाईल.
महिला आयपीएलमध्ये तीन संघ सहभागी होतील. वेलोसिटी, सुपरनोवा आणि ट्रेलब्लेझर अशी त्यांची नावे आहेत. तिन्ही कर्णधार हे भारतीय खेळाडू आहेत. मिताली राज वेलोसिटी संघाची कर्णधार आहे. तर सुपरनोवाचे नेतृत्व हरमनप्रीत कडे असेल तर ट्रेलब्लेजर्स स्मृती मंधानाच्या नेतृत्वात खेळतील.
वर्ष 2018 मध्ये प्रथम महिला टी 20 सामने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सुपरनोवा आणि ट्रेलब्लेजर्स हे दोनच संघ होते. अशाप्रकारे एक सामना खेळला गेला. यात सुपरनोवा विजयी झाला. 2019 मध्ये वेलोसिटी नावाचा आणखी एक संघ जोडला गेला. अशा प्रकारे तीन संघांमधील अंतिम सामन्यासह चार सामने खेळले गेले. त्यातही सुपरनोवाचा विजय झाला. आता सन २०२० मध्येही गतवर्षी इतकेच संघ असतील. सुपरनोव्हाला विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी असेल. यावर्षी संघांची संख्या चारवर वाढवण्याची योजना होती, परंतु कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे ही योजना सध्या पुढे ढकलण्यात आली.
Time to gear up for the #JioWomensT20Challenge ??⚡
We say BRING IT ON ??#Velocity #Supernovas #Trailblazers @M_Raj03 | @mandhana_smriti | @ImHarmanpreet | @reliancejio | @StarSportsIndia pic.twitter.com/uALPQDoyWN
— IndianPremierLeague (@IPL) November 2, 2020
आयपीएलमध्ये महिला प्रामुख्याने भारतीय खेळाडू आहेत. परंतु इंग्लंड, वेस्ट इंडीज, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि थायलंडमधील खेळाडूंचा यात समावेश आहे. सध्या ऑस्ट्रेलियामध्ये महिला बिग बॅश लीग सुरू आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची अनेक मोठी नावे आयपीएलपासून दूर आहेत.
महिला टी -20 चॅलेंज वेळापत्रक :
4 नोव्हेंबर सुपरनोवा विरुद्ध वेलोसिटी
5 नोव्हेंबर वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्लेजर्स
7 नोव्हेंबर ट्रेलब्लेजर्स विरुद्ध सुपरनोवा
9 नोव्हेंबर अंतिम सामना
वेलोसिटी – मिताली राज (कप्तान), अनघा मुरली, एकता बिष्ट, मनाली दक्षिणी, जहानारा आलम, वेदा कृष्णमूर्ति, मेघना सिंह, शिखा पांडे, लेई केस्पेरेक, स्यून लूस, सुषमा वर्मा, शफाली वर्मा, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शिनी, डैनी व्याट.
ट्रेलब्लेजर्स – स्मृति मंधाना (कप्तान), दीप्ति शर्मा, सिमरन बहादुर, नट्टकन चंटम, हरलीन देओल, डियांड्रा डोटिन, सोफी एकलस्टोन, ऋचा घोष, राजेश्वरी गायकवाड़, काश्वी गौतम,झूलन गोस्वामी, दयालन हेमलता, नुजहत परवीन, पूनम राउत, सलमा खातून.
सुपरनोवा – हरमनप्रीत कौर (कप्तान), जेमिमा रोड्रिग्स, तानिया भाटिया, चमारी अटापट्टू, पूनम यादव, अनुजा पाटिल, मुस्कान मलिक, अरुंधति रेड्डी, प्रिया पूनिया, अयाबोंगा खाका, पूजा वस्त्रकार, शशिकला सिरीवर्दने, राधा यादव, आयुषी सोनी, शकीरा सलमान.