मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या निवासस्थानी पोलिस दाखल झाले आणि त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शारीरिक अत्याचार केल्याचे अर्णब गोस्वामी यांचे म्हणणे आहे. अर्णब गोस्वामी आणि पोलीस यांच्यात भांडण झाल्याचे रिपब्लिक टीव्ही चॅनेलच्या स्क्रीनशॉटमध्ये दिसते आहे.
रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत. अर्णब गोस्वामी म्हणतात की, पोलिसांनी त्याच्या सासू आणि सासरे, मुलगा आणि पत्नीवर शारीरिक अत्याचार केले. रिपब्लिक टीव्हीवरील व्हिडिओवरून पोलिसांनी अर्णब गोस्वामीवरही हल्ला केला.
#IndiaWithArnab | Arnab Goswami confirms physical assault by police in his residence; Republic’s crew pushed away while he was speaking through van’s window; Fire in your support for #ArnabGoswami; Tune in #LIVE here – https://t.co/RZHKU3wOei pic.twitter.com/kHNNY9Kak4
— Republic (@republic) November 4, 2020
काय आहे प्रकरण?
५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.
रिपब्लिकचा काय दावा :
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.