अकरावी प्रवेशाबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या, “ऑनलाइन अभ्यासक्रमाबाबत सातत्याने प्रश्न विचारला जातोय की अभ्यासक्रम कधीपासून सुरु होणार आहे. कारण अकरावीचे काही प्रवेश बाकी आहेत. मधल्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजच महाअधिवक्त्यांशी चर्चा करणार आहे. त्यानंतर येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल.”