grant-robertson as Deputy Prime Minister of New Zealand
ग्लोबल

न्यूझीलंडच्या उपपंतप्रधानपदी समलैंगिक असलेल्या ग्रँट रॉबर्टसन यांची निवड

न्यूझीलंड मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाने पंतप्रधान जेंसिडा अर्डर्न यांच्या नेतृत्वात दमदार विजय मिळवला. अर्डन यांनी आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळाच्या निवडीत अर्डर्न यांनी समलैंगिक असलेले ग्रँट रॉबर्टसन यांची उपपंतप्रधानपदी निवड केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मागील महिन्यात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मजूर पक्षाला दणदणीत विजय मिळाला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यास यश आले. पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या नेतृत्वावर लोकांनी विश्वास ठेवला. आखलेल्या उपाययोजनांमुळे करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यात सरकारला यश मिळाले. या कामगिरीचा विजयात मोठा वाटा आहे.

अर्डर्न यांच्या २० सदस्यीय मंत्रिमंडळात महिला आणि माओरी समुदायाला प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. नानिया माहुता यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांची निवड ही गुणवत्तेच्या आधारे केली असल्याचे अर्डर्न यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील सहकारी कार्यक्षमता आणि कौशल्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. न्यूझीलंडच्या जनतेने दिलेल्या जनमताचे प्रतिबिंब आमच्या मंत्रिमंडळात उमटले असे त्यांनी म्हटले. एक देश म्हणून आम्हाला याचा अभिमान वाटला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

समलिंगी व्यक्तिला उपपंतप्रधानपद देण्याबाबत विचारले असता अर्डर्न यांनी सांगितले की, त्यांची निवड ही त्यांच्या नेतृत्व कौशल्यावर झाली आहे. त्यांची ओळख काय आहे हा मुद्दा दुय्यम असून ते प्रभावीपणे काम करत असल्याचेही अर्डर्न यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत