इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नलिस्टस ने (IFJ) व्हाइट पेपर ऑन ग्लोबल जर्नालिझममध्ये पत्रकारिता करण्यासाठी असुरक्षित असणार्या 5 देशांची नावे जाहीर केली आहेत. या अहवालात म्हटले आहे की 1990 ते २०२० या तीस वर्षांत एकूण 2658 पत्रकारांच्या हत्या झाल्याचं समोर आलं आहे.
इराक या यादीत अव्वल आहे. येथे 339 पत्रकार मारले गेले आहेत. त्यापाठोपाठ मेक्सिकोमध्ये 178 आणि फिलिपिन्समध्ये 178 पत्रकारांच्या हत्येची प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. यानंतर या यादीमध्ये पाकिस्तानचा क्रमांक आहे. पाकिस्तानमध्येही 1900 ते 2020 या वर्षात 138 पत्रकारांची हत्या झाली आहे. तर पाचव्या क्रमांकावर भारत असून या तीस वर्षांत ११६ पत्रकार मारले गेले आहेत.