महिला टी -20 चॅलेंजच्या तिसर्या सत्राचा दुसरा सामना व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात आज शारजा येथे दुपारी ३.30 वाजता खेळला जाईल. मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाकडे हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल. काल (बुधवारी) व्हेलॉसिटीने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासचा 5 गडी राखून पराभव केला. व्हेलोसिटीचा हा सुपरनोव्हासविरुद्धचा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने व्हेलॉसिटी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
US Election : जो बायडन बहुमताच्या जवळ, मतगणनेविरोधात डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डेमोक्रिटिकचे उमेदवार जो बायडन बहुमताच्या अगदी जवळ पोहोचले असून त्यांना 264 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत, त्यांना विजयासाठी केवळ 6 मतांची गरज आहे. तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प पिछाडीवर असून त्यांना आतापर्यंत 214 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. विजयासाठी उमेदवाराला 270 इलेक्टोरल मतांची गरज आहे. दुसरीकडे निवडणूक प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प सुप्रीम कोर्टात […]
राफेल लढाऊ विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल
राफेल या लढाऊ विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली आहे. ही माहिती भारतीय वायुसेनेने दिली आहे. फ्रान्सहून ३ राफेल लढाऊ विमाने काल संध्याकाळी ८.१४ मिनिटांनी भारतात पोहोचली आहेत. ही विमाने फ्रान्सहून थेट भारतात दाखल झाली आहेत. Second batch of IAF #Rafale aircraft arrived in India at 8:14 pm on 04 Nov 20 after flying non-stop […]
अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीचे पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप
काँकर्ड डिझाइन कंपनीचे संचालक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील फार्म हाऊस मध्ये आत्महत्या केली. अलिबाग पोलिसांना फार्म हाऊसमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात अन्वय यांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपयांची देणी थकविल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्महत्येसाठी या […]
खोपोलीजवळील रासायनिक लघू उद्योगात स्फोट
रायगड : खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा रात्री 2.30 च्या सुमारास जोरादार स्फोट झाला. आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या तसेच अनेक कंपन्यांच्या काचा तुटल्या, पत्र्यांचे शेड कोसळले. त्यामुळे शेजारील पेट्रोसोल कपंनीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन ते चार […]
अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी.
अलिबाग : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अलिबाग न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अर्णव गोस्वामी यांना पोलीस कोठडी देण्याची ठाकरे सरकारची मागणी न्यायालयाने फेटाळली. अर्णव गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. उद्या मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. अर्णव गोस्वामी यांना न्याय नक्की मिळेल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला […]
व्हेलॉसिटीचा 5 विकेटने विजय; सुषमा वर्माने फिरवला सामना
शारजा : सुपरनोव्हासने पहिल्यादा फलंदाजी करून 127 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेलॉसिटी संघाने १९.5 ओव्हरमध्ये 129 धावांपर्यंत मजल मारली आणि 5 विकेटने सामना जिंकला. व्हेलॉसिटीसाठी वेदा कृष्णमूर्ती, सुषमा वर्मा आणि सुने लूस यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि महिला टी-20 चॅलेंजमध्ये संघाला विजयी सुरुवात करून दिली. सुषमाने 34, वेदाने 29 आणि सुने लूसने नाबाद […]
अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक एफआयआर दाखल
रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आणखी एक नवी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. गोस्वामी यांना बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांनी त्यांच्या घरातून अटक केली. अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या पत्नीने पोलिसांच्या कारवाईला विरोध केला. यावेळी अर्णब यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्यावर कलम ३५३, ५०४, ५०६, […]
धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करा, गुलाबराव पाटील यांचे निर्देश
चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी धरण क्षेत्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पाणी दूषित होऊन शहराला दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग यांनी धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहरातील वाढत्या दूषित पाणी प्रश्नासंदर्भात […]
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त होऊन परतले घरी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते जसं आधी म्हणाले होते त्याप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. आज याच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन […]










