Allegations of Naik's wife and daughter

अन्वय नाईक यांच्या पत्नी व मुलीचे पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप

महाराष्ट्र

काँकर्ड डिझाइन कंपनीचे संचालक अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद यांनी दोन वर्षांपूर्वी अलिबाग येथील फार्म हाऊस मध्ये आत्महत्या केली. अलिबाग पोलिसांना फार्म हाऊसमध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यात अन्वय यांनी अर्णब यांच्यासह फिरोज शेख आणि नीतेश सारडा यांनी अनुक्रमे ८३ लाख, चार कोटी आणि ५५ लाख रुपयांची देणी थकविल्याने आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आमच्या आत्महत्येसाठी या तिघांना जबाबदार धरून कारवाई करावी, असे नमूद केले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तिघांविरोधात त्यानुसार अन्वय आणि कुमुद यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा नोंदवला होता. असे असूनही अलिबाग पोलिसांनी गुन्ह्य़ाचा तपास बंद का केला. तक्रार मागे घ्यावी यासाठी अलिबाग पोलिसांनी दबाव आणला, अर्णब यांचा जबाब मुंबईतील एका सहआयुक्ताच्या कार्यालयात का नोंदवला गेला, असे प्रश्न उपस्थित करून नाईक कुटुंबाने या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले. प्रभादेवी येथील निवासस्थानी अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता आणि कन्या आज्ञा यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे आरोप केले.

अर्णब यांनी ही रक्कम अदा केली असती तर अन्वय आणि सासू कुमुद यांनी नाहक जीव गमावला नसता. थकलेल्या रक्कमेबाबत अन्वय यांनी अर्णब यांना भेटण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. मात्र अर्णब यांनी अखेरपर्यंत अन्वय यांना भेट नाकारली, असा दावा अक्षता यांनी केला.

रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अनील पारसकर यांनी वारंवार तपास सुरू आहे, असेच सांगितले. प्रत्यक्षात हा तपास पोलिसांनी गुपचूप बंद केला. अन्वय यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक ध्वनिचित्रफीत समाजमाध्यमांवरून व्हायरल केली. ती पाहून रिपब्लिक वाहिनीने एक ट्वीट करून हे प्रकरण पोलिसांनी बंद केल्याचा दावा केला. त्यामुळे ही बाब समजली, असेही अक्षता यांनी सांगितले.

रक्कम अडकून पडल्याने अन्य अडचणीही उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळे अन्वय तणावात होते, असे अन्वय यांची कन्या आज्ञा हिने स्पष्ट केले. या प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी सुरेश वऱ्हाडे यांनी हे प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला. तक्रार मागे घेण्याबाबतच्या कागदापत्रांवर वऱ्हाडे यांनी आमची स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केल्यानंतर सतत धमक्या सुरू झाल्या. घरी, कार्यालयांत अनोळखी व्यक्ती येऊ लागल्या. पाठलाग सुरू झाला. याबाबत मुरबाड आणि दादर पोलीस ठाण्यात आम्ही तक्रारी नोंदवल्या, असा दावा आज्ञाने केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत