विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोनामुक्त झाले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते जसं आधी म्हणाले होते त्याप्रमाणे सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते.
आज याच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं. रुग्णालयाच्या बाहेर येताच देवेंद्र फडणवीस यांनी हात जोडून सगळ्यांना अभिवादनही केलं.
आजही ट्विट करत देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आज रुग्णालयातून घरी परतलो. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे.
मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार!
आज रुग्णालयातून घरी परतलो.
सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे.
मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचेही अनंत आभार! pic.twitter.com/OkvOabCRB3— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 4, 2020
देवेंद्र फडणवीस यांना दहा दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे ते त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत.