Velocity vs Trailblazers
क्रीडा

महिला टी -20 चॅलेंज : आज व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात सामना

महिला टी -20 चॅलेंजच्या तिसर्‍या सत्राचा दुसरा सामना व्हेलॉसिटी आणि ट्रेलब्लेजर्स यांच्यात आज शारजा येथे दुपारी ३.30 वाजता खेळला जाईल. मिताली राजच्या व्हेलॉसिटी संघाकडे हा सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी असेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

काल (बुधवारी) व्हेलॉसिटीने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सुपरनोव्हासचा 5 गडी राखून पराभव केला. व्हेलोसिटीचा हा सुपरनोव्हासविरुद्धचा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना सुपरनोव्हासने व्हेलॉसिटी ला 127 धावांचे लक्ष्य दिले, जे व्हेलॉसिटी संघाने १९.५ ओव्हर्स मध्ये गाठले.

मागील हंगामात जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा ट्रेलब्लेजर्सचा व्हेलॉसिटी ने 3 गडी राखून पराभव केला होता. ट्रेलब्लेजर्सने प्रथम फलंदाजी करताना 113 धावांचे लक्ष्य दिले होते, जे व्हेलॉसिटी ने 7 गडी गमावून पार केले होते.

ट्रेलब्लेजर्स च्या स्मृती मंधानाने 2 सामन्यात सर्वाधिक 100 धावा केल्या आहेत. मंधानाची सर्वोत्तम धावसंख्या 90 धावा आहे. हरलीन देओल ने 2 सामन्यात 79 धावा केल्या आहेत. तिची सर्वोत्तम धावसंख्या 84 धावा आहेत.

शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. शारजाहमध्ये नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत