IPL 2020: Match between Mumbai and Delhi

IPL 2020 : आज पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई आणि दिल्ली यांच्यात मैच

क्रीडा

IPL च्या 13 व्या सत्राच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटलमध्ये आज सायंकाळी ७.30 वाजल्यापासून दुबईमध्ये सामना रंगणार आहे. विजयी संघ थेट अंतिम फेरी गाठेल आणि पराभूत झालेल्या संघाला आणखी एक संधी मिळेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

क्वालिफायर -1 मध्ये हरलेल्या या संघाचा सामना 6 नोव्हेंबरला एलिमिनेटर सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे. त्या सामन्यात विजयी होणारा संघ अंतिम फेरी गाठेल. अबुधाबी येथे एलिमिनेटरचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

मुंबई व दिल्लीने गुणतालिकेत टॉप -२ मध्ये स्थान मिळविले आहे. हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले. मुंबईने दोन्ही वेळा दिल्लीचा पराभव केला. मुंबईने अबू धाबी येथे झालेल्या मोसमातील 27 व्या सामन्यात 5 विकेट आणि दुबईतील 51 व्या सामन्यात 9 विकेट राखून दिल्लीला पराभूत केले.

दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत