Explosion in small scale chemical industry near Khopoli

खोपोलीजवळील रासायनिक लघू उद्योगात स्फोट

महाराष्ट्र

रायगड : खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा रात्री 2.30 च्या सुमारास जोरादार स्फोट झाला. आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या तसेच अनेक कंपन्यांच्या काचा तुटल्या, पत्र्यांचे शेड कोसळले. त्यामुळे शेजारील पेट्रोसोल कपंनीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन ते चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद आणि पेण नगरपरिषदेच्या एकूण 10 फायर ब्रिगेड टीमने चार तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविले. स्फोटाचा आवाज कानावर पडताच परिसरातील ग्रामस्थांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. शेजारील अनेक लघू उद्योगातील कामगारांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले. खालापूर उपविभागीय अधिकारी सजंय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सह पो. नि. असवरे, पीएसआय वळसंग, पीएसआय किसवे यांच्यासह खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिथल्या लोकांची मदत केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत