NDA wins absolute majority in Bihar elections
राजकारण

बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..

पाटणा  : बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, बहुमतहि मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात […]

IPL 2020 MI vs DC Mumbai Indians won by 5 wickets
क्रीडा

IPL 2020 MI vs DC : मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा घातली आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी

दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या  पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत […]

IPL 2020: Today's final match between Mumbai Indians and Delhi Capitals
क्रीडा

IPL 2020 Final, MI vs DC Live Updates : मुंबई विरुद्ध दिल्ली मॅच अपडेट्स; मुंबईचा दिल्लीवर 6 विकेट्सने शानदार विजय

दुबई : IPL 2020 Final Live Score MI vs DC आयपीएलचा अंतिम सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जात आहे. दिल्लीने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फायनल मॅच दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळली जात आहे. या सामन्यात जिंकून मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद पटकावण्याची संधी आहे. तर दिल्लीचा पहिल्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न असणार […]

A young woman was abducted, gang-raped and forcibly poisoned
महाराष्ट्र

तरुणीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, बळजबरीने विष पाजून केली हत्या

जळगाव : २० वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर पीडित तरुणीला शिवीगाळ व मारहाण करत बळजबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातील पारोळा शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. पीडित तरुणीचा आज, मंगळवारी पहाटे धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित तरुणी […]

BJP remain in Madhya Pradesh by-election results
देश

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालात भाजप कायम राहणार की सत्तापालट होणार?

मध्य प्रदेशातील २८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणीला सकाळी ८.०० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. २८ जागांसाठी तब्बल ३५५ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. एकूण २८ जागांपैंकी १९ जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहेत तर ८ जागांवर काँग्रेस आणि एका जागेवर बसपा उमेदवार आघाडीवर आहे. मंधांता मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून या जागेवर भाजपचे उमेदवार नारायण पटेल यांना विजयी […]

counting of votes for the Bihar Assembly elections
देश

बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार

बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी चालू असताना निवडणूक आयोगाने सांगितले आहे की ही मोजणी रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे २०१५च्या निवडणुकीच्या तुलनेत ६३% अधिक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे लावली असल्याने हा विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले, कोव्हिड-19च्या संकटामुळे मतदान केंद्रांची संख्या जवळपास ६३% नी वाढवण्यात आली होती आणि […]

Scooby Doo cartoonist Ken Spears dies
मनोरंजन

‘स्कूबी डू’ कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन

‘स्कूबी डू’ हे अतिशय लोकप्रिय कार्टूनपैकी एक आहे. या कार्टूनचे निर्माता केन स्पीअर्स यांचं निधन झालं आहे. ते ८२ वर्षांचे होते. केनचा मुलगा केव्हीन याने त्यांच्या निधनाची बातमी दिली. गेली काही वर्ष ते बॉडी डिमेंशिया या आजारामुळे त्रस्त होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. ‘Scooby-Doo’ co-creator Ken Spears dies at 82 (via […]

will Nitish Kumar be the Chief Minister
राजकारण

बिहार निवडणूक निकाल : भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला तर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार?

बिहारमध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल अशी चिन्हे आहेत. एनडीएने सत्ता मिळवल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचं काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे. भाजपा-जेडीयू आघाडीने सत्ता मिळवल्यानंतर नितीश कुमार मुख्यमंत्री होणार की नाही हे सर्वस्वी भाजपावर अवलंबून असेल. निवडणूक प्रचारात आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत असे भाजपाचे नेते म्हणत होते. पण बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष […]

Marathi artists met Raj Thackeray
महाराष्ट्र मुंबई

मराठी नाट्य कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली

कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित […]

central government gave expansion to kusum yojana
देश शेती

केंद्र सरकारने कुसुम योजनेचा केला विस्तार, शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुला

केंद्र सरकारने कुसुम योजनेचा आणखी विस्तार केला असून आता त्यातून 30,800 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. या योजनेसाठी सरकारला 34,035 कोटी रुपये खर्च येणार आहे. या योजनेंतर्गत पुढील दोन आर्थिक वर्षांत एकूण 35 लाख शेतकर्‍यांना सौरऊर्जेवर चालणारे पंप चालवण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या योजनेमुळे देशाला डिझेल चालवणाऱ्या सिंचन पंपांपासून मुक्ती मिळेल, तसेच […]