NDA wins absolute majority in Bihar elections
राजकारण

बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय; नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार..

पाटणा  : बिहारमध्ये चुरशीच्या लढतीत एनडीएचा विजय, बहुमतहि मिळाले. यामुळे नितीश कुमार हेच मुख्यमंत्री पदावर राहणार हे निश्चित झाले. राज्यात ७५ जागा जिंकून आरजेडी हा पहिल्या क्रमांकाचा तर ७४ जागा जिंकून भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. एनडीएने १२५ आणि महागठबंधनने ११० जागा जिंकल्या. एनडीएमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष झाला. तसेच बिहारमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष भाजप झाला. राष्ट्रीय जनता दल बिहारमध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला. महागठबंधनला बहुमताचा आकडा गाठणे जमले नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला २४३ पैकी १२५ जागांवर विजय मिळाला. भाजप ७४, जेडीयू ४३, हम आणि व्हीआयपी प्रत्येकी ४ जागांवर विजयी झाले. बिहार विधानसभेसाठी एनडीए म्हणून निवडणूक लढवताना जेडीयू ११५, भाजप १११, विकासशील इन्सान पार्टी ११ आणि हिंदुस्तानी अवाम मोर्चा ७ जागांवर निवडणूक लढले होते.

महागठबंधन ११० जागांवर विजयी झाले. आरजेडी ७५, काँग्रेस १९, सीपीआय माले १२, सीपीएम २, सीपीआय २ जागांवर विजयी झाले. महागठबंधनमध्ये राष्ट्रीय जनता दल हा पक्ष सर्वाधिक १४४ जागांवर निवडणूक लढवत होता. काँग्रेस ७० जागांवर सीपीएम चार जागांवर तर तर सीपीआय सहा जागांवर आणि सीपीआय माले १९ जागांवर निवडणूक लढले होते.

बिहार विधानसभा निवडणूक २०२० – पक्षनिहाय निकाल

बहुमताचा जादुई आकडा – १२२ जागा |  बिहार विधानसभा एकूण जागा – २४३

एनडीए – १२५ जागांवर विजय

  1. भाजप  – ७४
  2. जेडीयू  – ४३
  3. विकासशील इन्सान पार्टी –
  4. हिंदुस्तानी अवाम मोर्चा

महागठबंधन – ११० जागांवर विजय

  1. राष्ट्रीय जनता दल – ७५
  2. काँग्रेस  – १९
  3. सीपीआय माले  – १२
  4. सीपीआय –
  5. सीपीएम –

लोक जनशक्ती पार्टी  – १ जागेवर विजय
इतर – ७ जागांवर विजय

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत