कोरोना आणि लॉकडाउन यामुळे नाट्य कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या कलाकारांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. नाटक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शक यांनी नाटक सुरु करण्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी आज राज ठाकरेंसमोर मांडल्या. यावेळी प्रशांत दामले, अभिनेत्री वंदना गुप्ते, महेश मांजरेकर, वामन केंद्रे, पंढरीनाथ कांबळे, अजित भुरे, अतुल परचुरे हे सगळे उपस्थित होते. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही यावेळी उपस्थित होते.
मिशन बिगिन अगेन अंतर्गत काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारने नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती दिली आहे. कंटेन्मेंट झोनच्या बाहेरची नाट्यगृहं, सिनेमागृहं आणि मल्टिप्लेक्स उघडण्यास संमती देण्यात आली आहे. नाट्यगृह, सिनेमागृहं यांच्या एकूण आसन क्षमतेच्या ५० टक्के आसनक्षमतेने प्रेक्षकांना उपस्थित राहता येणार आहे. तरीही नाटक सुरु करण्यासंदर्भात येणा-या अडचणी संपलेल्या नाहीत. याच अडचणींबाबत मराठी कलाकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
नाटक कलाकार,निर्माते आणि दिग्दर्शकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट, नाटक सुरु करण्यासंदर्भात येणा-या अडचणी राज ठाकरेंसमोर मांडल्या . pic.twitter.com/JDJ9fJronO
— MNS Report (@mnsreport9) November 10, 2020