David Warner will miss next matches due to injury
क्रीडा

IND vs AUS : दुखापतीमुळे डेव्हिड वॉर्नर खेळणार नाही पुढील सामने

वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. यानंतर डेव्हिड वॉर्नरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्याचं समोर आलं आहे. दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. वॉर्नरने दोन्ही […]

BJP MLA Kiran Maheshwari
देश

भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन

राजस्थानच्या राजसमंद येथील भाजपाच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात आमदार किरण माहेश्वरी यांच्यावर उपचार सुरू होते. त्या राजस्थानच्या दुसऱ्या आमदार ठरल्या आहेत, ज्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आमदार किरण माहेश्वरी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान कोटा येथे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं होतं. त्यांच्याकडे कोटा उत्तर महापालिका […]

Accident Near Navale Bridge In Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघातात तब्बल 8 गाड्यांची एकमेकांना धडक; दोघे ठार तर 4 जण गंभीर जखमी

पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ आज (२९ नोव्हेंबर २०२०) सव्वासहा वाजता साताऱ्याहून मुंबईला जाणाऱ्या एका टेम्पोचा ब्रेक फेल होऊन झालेल्या अपघातात अनेक वाहने एकमेकांना धडकली. अपघातात एका मोठ्या कंटेनरने पेट घेतला. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईला एक ट्रक मोकळा जात […]

IND vs AUS 2nd ODI: Australia set India 390 run target
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी दिलं 390 धावांचं आव्हान

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि अ‌ॅरॉन फिंच या दोघांनी 142 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी मोहम्मद […]

Agriculture laws end farmers' problems - Prime Minister Narendra Modi
देश शेती

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपू लागल्या – पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेतकर्‍यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बऱ्याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी यावेळी कृषी कायद्याला होत असलेला विरोध आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. […]

The idol of Goddess Annapurna stolen from India 100 years ago is coming to India
देश

देवी अन्नपूर्णाची १०० वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली मूर्ती येतेय भारतात

१०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली. मोदी म्हणाले, “मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक […]

MP Udayanraje Bhosle on Maratha reservation
महाराष्ट्र

मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं, खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेसाठी खास बॅनर बनवण्यात आलं होतं. त्यावर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं […]

Prime Minister Narendra Modi visited Serum Institute
पुणे

सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत

पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली. देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान […]

The youth committed suicide
महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने तरुणाने केली आत्महत्या

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने महेश झोरे या तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेशला स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे होते. महेशचे आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी तो कोर्ले इथल्या गावाकडच्या घरी आला होता. एकटा […]

Outsiders should not claim the vaccine made by Punekar - Supriya Sule
पुणे महाराष्ट्र

पुणेकरांनी बनविलेल्या लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये – सुप्रिया सुळे

पुणेकरांनी बनविलेल्या कोरोनावरील लसीवर बाहेरून आलेल्यांनी क्लेम करू नये, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली. पुण्याच्या मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. तुमच्या इथे 1400 कोटी, 1500 कोटींच्या गप्पा चालतात. आमच्या दिल्लीत तर एक लाख कोटींच्या गप्पा असतात. या गप्पा कोण […]