The idol of Goddess Annapurna stolen from India 100 years ago is coming to India
देश

देवी अन्नपूर्णाची १०० वर्षांपूर्वी भारतातून चोरीला गेलेली मूर्ती येतेय भारतात

१०० वर्षांपूर्वीची अन्नपूर्णा देवीची मूर्ती भारतातून चोरून कॅनडामध्ये नेली गेली होती. ही मूर्ती पुन्हा भारतात येत आहे, ही भारतीयांसाठी गर्वाची गोष्ट आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून दिली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मोदी म्हणाले, “मी आज सर्वांना एक आनंदाची बातमी देत आहे. प्रत्येक भारतीयाला हे ऐकून गर्व वाटेल की, देवी अन्नपूर्णाची एक खूपच जुनी मूर्ती कॅनडातून भारतात परत येत आहे. ही मूर्ती सुमारे १०० वर्षांपूर्वी १९१३ रोजी वाराणसीतील एका मंदिरातून चोरून देशाबाहेर नेण्यात आली होती. मी कॅनडा सरकार आणि हे पुण्य कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे आभार मानतो.”

“देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीचा काशी शहराशी खूपच खास संबंध आहे. आता देवीची मूर्ती परत भारतात येणं आपल्या सर्वांसाठी सुखद आहे. देवी अन्नपूर्णाच्या मूर्तीसह आपल्या परंपरेतील अनेक अनमोल ठेवा आंतरराष्ट्रीय टोळ्यांचे शिकार झाला आहे. आता यावर भारताकडून दावा करण्यात येत आहे. या मूर्ती भारतात आणण्यासाठी भारताने आपले प्रयत्न देखील वाढवण्यात आले आहेत. या प्रयत्नांमुळेच गेल्या काही वर्षात भारत अनेक मूर्ती आणि कलाकृती पुन्हा देशात आणण्यात यशस्वी ठरला आहे”, अशी माहिती पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत