The youth committed suicide
महाराष्ट्र

एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने तरुणाने केली आत्महत्या

रत्नागिरी : कोरोनाच्या काळात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरून एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने महेश झोरे या तरुणाने आत्महत्या केली आहे. लांजा तालुक्यातील कोर्ले गावात ही घटना घडली आहे. महेशला स्पर्धा परीक्षा पास होऊन मोठा अधिकारी बनायचे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

महेशचे आई-वडील आणि दोन भाऊ कामानिमित्त मुंबईला राहत होते. अभ्यास करण्यासाठी तो कोर्ले इथल्या गावाकडच्या घरी आला होता. एकटा राहणाऱ्या महेशला भेटण्यासाठी त्याचे आजोबा गुरुवारी कोर्ले इथल्या घरी आले त्यावेळी महेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांना मोठा धक्का बसला, पण महेशने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. एमपीएससी परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने नैराश्यातून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने नमूद केलं होतं. लांजा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत