वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. यानंतर डेव्हिड वॉर्नरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्याचं समोर आलं आहे.
दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. वॉर्नरने दोन्ही सामन्यांमध्ये धडाकेबाज अर्धशतकी खेळी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. वॉर्नर संघाबाहेर गेल्यामुळे ऑस्ट्रेलियाने डार्सी शॉर्टला टी-२० संघात जागा दिली आहे.
Some bad news for Australia fans ?
David Warner has limped off the field after appearing to have hurt his groin while fielding in the second innings.#AUSvINDpic.twitter.com/8whmf2nEDD
— ICC (@ICC) November 29, 2020




