वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या वन-डे सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना वॉर्नरला दुखापत झाली होती. ज्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता. यानंतर डेव्हिड वॉर्नरची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात त्याचा मांडीचा स्नायू दुखावल्याचं समोर आलं आहे. दुखापतीमुळे सलामीवीर डेव्हिड वॉर्नर अखेरची वन-डे आणि टी-२० मालिका खेळू शकणार नाही. वॉर्नरने दोन्ही […]

