Prime Minister Narendra Modi visited Serum Institute

सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली भेट, आदर पुनावाला यांनी सहकुटुंब केलं स्वागत

पुणे

पुणे : कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भेट दिली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला यांनी सहकुटुंब मोदींचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदर पुनावालांच्या मुलाच्या पाठीवर हात ठेवत विचारपूस केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

देशभरात कोरोना लसीची निर्मिती आणि त्याच्या वितरणाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तीन शहरांचा दौरा केला. मोदींनी अहमदाबाद, नंतर हैदराबाद आणि शेवटी पुण्यातील कोरोना लस उत्पादनाचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील संशोधकांशीही चर्चा केली.

सीरम इन्स्टिट्यूटकडून आतापर्यंत पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती करण्यात आली आहे. जगभरात वेगवेगळ्या आजारांवर वापरल्या जाणाऱ्या लसींपैकी 65 टक्के लसी या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्राझेनेका यांच्यासोबत करार केलेला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत