MP Udayanraje Bhosle on Maratha reservation

मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं, खासदार उदयनराजे भोसले आक्रमक

महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्हाला सोडवता येत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, मी जबाबदारी घेतो,’ अशा शब्दात उदयनराजे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवला आहे. पत्रकार परिषदेसाठी खास बॅनर बनवण्यात आलं होतं. त्यावर ‘मराठा आरक्षण किती दिवस मागायचं? आता हिसकवायचं!’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन उदयनराजे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं आज पहायला मिळालं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या सरकारच्या काळात करुन दाखवलं होतं, पण त्यांना नावं ठेवली जातात. आज तुम्ही सत्तेत आहात तर करुन दाखवा,’ असं आव्हान उदयनराजे यांनी राज्य सरकारला दिलं. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली. त्यानंतर अद्याप राज्य सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नसल्याचा आरोप उदयनराजे यांनी केला आहे. शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, सर्वधर्मसमभावाचा विचार सांगायचा आणि एखाद्या समाजाला दाबण्याचं कामच आजपर्यंत झाल्याची टीका उदयनराजे यांनी केली.

आपण मराठा समाजात जन्माला आलो असलो तरी आज मराठा म्हणून बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आधार घेऊन, प्रत्येक समाजातील व्यक्तीला न्याय मिळायला हवा, या भूमिकेतून मुद्दे मांडत असल्याचं उदयनराजे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्यांनीच मार्गी लावला पाहिजे, कारण त्यांनीच हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवला असंदेखील ते यावेळी म्हणाले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत