Senior social worker Anna Hazare

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी केली प्रकृतीची चौकशी

पुणे महाराष्ट्र

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ह्रदयासंबधी समस्येमुळे रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली असून त्यांच्यावर एंजीओग्राफीसह आणखी काही तपासण्या करण्यात आल्या आहेत. तसेच अण्णांवर शस्त्रक्रियेची गरज नसल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अण्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तसंच ते लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा ही व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री सध्या एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावरही फिजिओथेरपी सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत