father beat the son by hanging him from the ceiling fan for not completing his homework

धक्कादायक! गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला पंख्याला उलटं टांगून केली मारहाण

क्राईम

राजस्थान : राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका निर्दयी बापाने आपल्या ८ वर्षांच्या मुलाला छताच्या पंख्याला मुलाला उलटं टांगून बेदम मारहाण केली. या मुलाने शाळेतून दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने बापाने मुलाला अमानुषपणे मारहाण केली. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

बुंदी जिल्ह्यातील डाबी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरोली गावात हा धक्कादायक प्रकार घडला. खदानीत काम करणाऱ्या पुष्कर प्रजाप्त याने आपल्या मुलाला मारहाण केल्याचा आरोप आहे. गृहपाठ पूर्ण न करता तो खेळायला गेला होता. याचा राग आल्याने बापाने त्याला पंख्याला उलटे टांगून मारहाण केली. मुलाच्या आईने मुलाला आपल्या पतीच्या तावडीतून सोडवण्याचे बरेच प्रयत्न केले. परंतु, त्याने काहीही ऐकले नाही. मुलाच्या आईने आपल्या मोबाइलमध्ये या घटनेचा व्हिडिओ बनवून चित्तौडमध्ये राहणाऱ्या आपला भाऊ चंद्रभान प्रजाप्त याला पाठवला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

चंद्रभानने व्हिडिओ मिळाल्यानंतर चित्तौड जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ही घटना दुसऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे, त्यामुळे या ठिकाणी गुन्हा नोंदवू शकत नाही असे तिथल्या स्थानिक पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले. त्यानंतर चंद्रभान याने चाइल्डलाइन समन्वयक भूपेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यांनी ते प्रकरण बुंदी जिल्ह्यातील शाखेकडे पाठवले. बुंदीच्या चाइल्डलाइन समन्वयकांनी हे प्रकरण डाबी पोलीस ठाण्यात कळवल्यानंतर हे प्रकरण उघड झाले.

पोलीस या घटनेच्या तपासासाठी गावात गेले असता त्यांच्या घराला कुलूप लावलेले आढळले. त्यामुळे पोलिसांना परत यावे लागले. मुलाची आई भेटू न शकल्याने तक्रार दाखल करून घेऊ शकलो नाही, असे डाबी पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर बाल अधिकार संरक्षणासाठी स्थापन केलेल्या राजस्थान राज्य समितीने जिल्हा अधीक्षकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत