The two brutally murdered a 15-year-old vegetable seller

धक्कादायक! हिंगोलीतील तरुण शेतकऱ्याच्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, वडिलांनीच केली निर्घृण हत्या…

क्राईम महाराष्ट्र

हिंगोली : शेतकरी देवानंद मुधोळ (वय 20) यांचा मागील आठवड्यात खुन झाला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या देवानंद यांच्या वडिलांनीच केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना आज (२७ मे) दुपारी ताब्यात घेतले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथील संतोष मुधोळ यांचे गावापासून काही अंतरावर १२ एकर शेत आहे. संतोष मुधोळ यांचा मुलगा देवानंद हा शनिवारी (२१ मे) रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. मात्र, रविवारी सकाळी तो घरी परतला नाही. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र पोलिसांना हत्या करण्याचे कोणतेही कारण सापडत नव्हते. घटनास्थळी कुठल्याही प्रकारचा पुरावा मिळत नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर या खुनाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान होते.

मागील दोन वर्षापासून देवानंद हा शेती करत होता. तो होतकरू होता आणि वडिलांनी घेतलेले कर्जही त्याने फेडले होते. तसेच वडिलांना यापुढे कोणीही पैसे देऊ नये, असे त्याने सर्वांना सांगितलेले होते. काही दिवसांपूर्वीच संतोष मुधोळ याने बकरा विकला होता, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. देवानंद रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. तसेच मृत देवानंद याचे कोणाशी शत्रुत्वही नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी देवानंद यांचे वडील संतोष मुधोळ यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तेव्हा त्यानेच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

देवानंद याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून केल्याची माहिती वडील संतोष मुधोळ यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यासाठी पोलिसांचे पथक गौळ बाजारकडे रवाना झाले. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शना खाली यातिष देशमुख, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे, सहायक निरीक्षक रोयलावार, उपनिरीक्षक सोनुळे, जमादार घ्यार, एस. पी. सांगळे यांच्या पथकाने तपास सुरू केला व खूनाचा उलगडा केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत