Good News For Rajasthan Royals Before The Qualifier 2 Against Rcb

सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी गूड न्यूज, सामन्यापूर्वी नेमकं घडलं तरी काय…

क्रीडा

अहमदाबाद : राजस्थान रॉयल्ससाठी आज सर्वात महत्वाचा सामना सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे.  राजस्थानच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण यापूर्वीच्या सामन्यात राजस्थआनला गुजरातकडून पराभवाचा धक्का बसला होता. पण पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे सर्वात महत्वाचे समजले जात आहे. या खेळपट्टीवर कोणत्याही भेगा नाहीत, त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठी फटकेबाजी करता येऊ शकते. त्याचबरोबर संजू सॅमसन हा सातत्याने टॉस हरत असल्याचे समोर येत होते. पण या महत्वाच्या सामन्यात मात्र संजूने टॉस जिंकला आहे. संजूने टॉस जिंकत यावेळी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता आरसीबी जे आव्हान ठेवेल त्याचा यशस्वी पाठलाग त्यांना करावा लागणार आहे. पण यासाठी दोन सकारात्मक गोष्टी राजस्थानच्या संघाकडे असतील.

पहिली गोष्ट म्हणजे दुसऱ्या डावात दवाचे प्रमाण जास्त असते आणि त्याचा फायदा त्यांच्या फलंदाजांना मिळू शकतो. कारण दव पडल्यावर चेंडू ओला होतो आणि तो जास्त जड होतो. त्यामुळे चेंडू बॅटवर उत्तमरीत्या येतो आणि याचा फायदा फलंदाजांना होत असतो. त्यामुळे हा फायदा नक्कीच राजस्थानला मिळणार आहे. त्याचबरोबर खेळपट्टीवर यावेळी पाटा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करताना चेंडू संथगतीने येणार नाही. चेंडू बॅटवर थेट येईल आणि त्याचा फायदा राजस्थानला होणार आहे. त्यामुळे राजस्थानसाठी या जमेच्या बाजू असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राजस्थानचा संघ या सामन्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. आरसीबीचा संघ या सामन्यात किती धावा करतो आणि राजस्थानचा संघ हे आव्हान पूर्ण करतो का याकडे सर्वांचे लक्ष असेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत