ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 390 धावांचं तगडं आव्हान दिलं आहे. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 389 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 104 धावा केल्या तर डेव्हिड वॉर्नरने 83 धावांची खेळी केली.
टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने बॅटिंगचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच या दोघांनी 142 धावांची सलामी भागीदारी केली. ही जोडी मोहम्मद शमीने फोडली. त्यानंतर खेळायला आलेल्या स्टीव्ह स्मिथने चौकारांची आतषबाजी केली. आपल्या शतकी खेळीत त्याने 14 चौकार तर दोन षटकार लगावले. त्याने अगदी पहिल्या बॉलपासून आक्रमक फटके मारले. मार्नस एलने 61 बॉलमध्ये 70 रन्स केले. ग्लेन मॅक्सवेलने देखील आपल्या आक्रमक अंदाजात बॅटिंग केली. केवळ 29 बॉलमध्ये 63 धावा ठोकल्या. त्याने 4 चौकार आणि 4 षटकार लगावले.