If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नारायण राणेंचा मोठा दावा : जयंत पाटलांची भाजपमध्ये जाण्यासाठी सगळी बोलणी झाली होती; गद्दारी करून सरकार स्थापन

रत्नागिरी : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं नसतं तर जयंत पाटील हे भाजपामध्ये असते, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला झालेल्या वर्षपूर्तीनिमित्त सरकारच्या अपयशाबाबत बोलण्याकरता आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणेंनी केलेल्या गौप्यस्फोटावरून आता काही प्रमाणात का असेना पण उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना नारायण राणे यांनी म्हटलं […]

Fire breaks out at powai mhada colony building
महाराष्ट्र मुंबई

पवईत म्हाडा कॉलनीतील इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई : पवईतील हिरापन्ना मॉलसमोरील म्हाडा कॉलनीतील एनटीपीसी इमारतीच्या सहाव्या माळ्यावर एका घरात आज (30 नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचे काम करत आहेत. सध्या या इमारतीतील सर्व रहिवाश्यांना बाहेर काढण्यात […]

What exactly did Sheetal Amte want to say?
महाराष्ट्र

डॉ. शीतल आमटे यांना नेमकं काय सांगायचं होतं? आत्महत्येपूर्वी त्यांनी केलेलं ट्विट चर्चेत

डॉ. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेत आत्महत्या केली. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. डॉ. शीतल आमटे या सध्या मानसिक ताण व नैराश्याचा सामना करीत होत्या, अशी देखील चर्चा आहे. परंतु, त्यांनी आत्महत्येच्या काही तास अगोदर ‘वॉर अँड पीस’ असं लिहीत कॅनव्हासवरील एक चित्र ट्विट […]

Samsung Galaxy S21 smartphone
तंत्रज्ञान

Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लवकरच होणार लॉन्च, आवाजाने होणार अनलॉक

Samsung लवकरच आपला Samsung Galaxy S21 स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. या फोनची खास वैशिष्ट्ये लॉन्च करण्याआधी समोर आली आहेत. Samsung Galaxy S21 च्या नवीन व्हाइस अनलॉक फीचर (Voice Unlock Feature) ची चर्चा सध्या होत आहे. या नवीन फोनमध्ये व्हाइस कमांड दिली असून फोन आवाजाने चालू-बंद करता येवू शकणार आहे. Samsung Galaxy S21 मध्ये सध्या Amazon […]

Actor Rahul Roy
मनोरंजन

अभिनेता राहुल रॉय यांना चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका

अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे […]

Baba Amte's granddaughter Sheetal Amte commits suicide
महाराष्ट्र

बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या

डॉ. विकास आमटे यांच्या कन्या व महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरी शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. शीतल यांनी आनंदवन येथील राहत्या घरी विषाचे इंजेक्शन घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले, पण तिथे त्यांना मृत […]

Virat's decision is pure madness, criticism of the former Indian bowler
क्रीडा

विराटचा ‘हा’ निर्णय म्हणजे निव्वळ वेडेपणा, माजी भारतीय गोलंदाजाची टीका

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसऱ्या सामन्यात विराटने मयांक अग्रवालचा सहावा गोलंदाज म्हणून वापर केला. सहावा गोलंदाज म्हणून मयांकचा वापर करण्याच्या विराटच्या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश यांनी टीका […]

Brutal killing of 43 agricultural laborers
ग्लोबल

भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृण हत्या

ईशान्य नायजेरियाच्या माइदुगुरी शहराजवळ बोको हरामच्या दहशतवाद्यांनी भाताच्या शेतात काम करणाऱ्या ४३ शेतमजुरांची निर्घृणपणे मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली आहे. या हल्ल्यात ६ मजूर गंभीररित्या जखमी झाले आहेत. माहितीनुसार या हल्लेखोरांनी आधी या मजुरांना बांधलं आणि नंतर कोशोबे गावांत त्यांची मानेवर धारदार शस्त्र चालवून हत्या केली. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी या हल्ल्याचा तीव्र […]

Actress accuses casting director ayush Tiwari of rape
मनोरंजन

अभिनेत्रीने कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर केला बलात्काराचा आरोप

मुंबई : टीव्ही अभिनेत्रीने कलाकारांची निवड करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीवर बलात्कार केल्याचा आरोप केला. अभिनेत्रीने मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार नोंदवली आहे. कलम ३७६ अंतर्गत एफआयआर नोंदवून मुंबई पोलिसांनी अभिनेत्रीचे स्टेटमेंट घेतले. लग्नाचे आश्वासन देऊन कास्टिंग डायरेक्टर आयुष तिवारीने बलात्कार केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. महिलेने बलात्काराचे आरोप केले तर आरोपीला एफआयआर नोंदवल्यापासून […]

Union Minister Nitin Gadkari
महाराष्ट्र राजकारण

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे – नितीन गडकरी

राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हाताऱ्या बैलासारखे आहे. या सरकारला तुतारी घेऊन सतत टोचत राहावे लागते. त्याशिवाय ते पुढेच जात नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी नागपुरात केली. नागपूर पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ पूर्व विदर्भाच्या पदवीधरांच्या मेळाव्यात ते बोलत होते. नितीन गडकरी यावेळी म्हणाले, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाची निविदा काढण्यात […]