अभिनेता राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह द बॅटल या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. सध्या त्यांच्यावर मुंबईच्या नानावटी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
राहुल रॉय यांना मेंदूघाताचा झटका आल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारगिलमध्ये सध्या प्रचंड थंडी असून तापमान उणे अंशांमध्ये आहे. त्यामुळे राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याचा अंदाज आहे. प्रकृती बिघडल्यानंतर राहुल रॉय यांना प्रथम कारगिलहून श्रीनगरला आणि त्यानंतर मुंबईला आणण्यात आलं.